गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिक:- दिनांक १९/०६/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ कडील नेमणुकीचे पोअं/१४०५ आप्पा पानवळ हे मुंबईनाक्यावरून ते राहत असलेल्या ठिकाणी अशोका मार्गे रोडने जात असतांना रात्री ०९:०५ वाजेच्या सुमारास त्यांना भारत नगर, वडाळा रोड येथे लोकांची गर्दी जमा झालेली दिसली. तेव्हा त्यांनी त्यांचे ताब्यातील मोटार सायकल रस्त्याचे कडेला लावुन सदर ठिकाणी गेले असता त्यांनी सदर ठिकाणी काय प्रकार आहे व काय झाले बाबत विचारपुस केली असता गर्दीतील जमा असलेल्या लोकांकडुन माहिती मिळाली की, एका इसमाने परवेज शेख नावाच्या इसमास चाकुने भोसकुन मारहाण केली असुन त्या इसमास दवाखान्यात नेण्यात आले आहे अशी माहिती मिळाली, तेव्हा एक संशयित इसम पळत जातांना दिसला व त्याचे अंगावर रक्ताचे डाग दिसुन आल्याने सदर इसमाचा संशय आल्याने पोलीस अंमलदार/१४०५ आप्पा पानवळ यांनी तात्काळ गुन्हेशाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलीस निरिक्षक यांना माहिती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/हेमंत तोडकर, पोहवा/शरद सोनवणे, धनंजय शिंदे, महेश साळुंखे, पोअं/विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, चालक समाधान पवार असे सरकारी वाहन क. एम.एच.१२ पी.क्यु. ३७४३ हिचेत बसुन घटनास्थळी पोहचले. त्यानंतर आरोपीतास ताब्यात घेण्यात आले. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अकिब गुफरान इद्रिस सैय्यद वय-२८वर्षे रा. भारत नगर, गल्ली नं. २, वडाळा रोड, नाशिक असे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सांगितले परवेज शेख व मी मित्र असुन रात्री ०९:०० वाजेच्या सुमारास माझे परवेज शेख यांचे मोबाईल खरेदी विकी वरून वाद झाल्याने मी त्यास चाकुने वार करून भोसकले असल्याची कबुली दिली. त्यावरून सदर प्रकरणी मुंबईनाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे । गुरनं. १८५/२०२४ भादविक ३०२ प्रमाणे दाखल असल्याने सदर इसमास पुढील तपासकामी मुंबईनाका पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक., मा. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/ हेमंत तोडकर, पोहवा/शरद सोनवणे, धनंजय शिंदे, महेश साळुंखे, पोअं/विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, चालक समाधान पवार अशांनी केलेली आहे.