दुचाकीचालकावर गुन्हा दाखल
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- भुवनेश दुसाने
जळगाव:- धरणगाव शहरातील अमळनेर रस्त्यावरील पांढऱ्या विहिरीच्या पुढे आईसोबत पायी चालत असलेल्या चिमुरडीला दुचाकीस्वाराने भरधाव वाहन चालवून जोरदार धडक दिली. या धडकेत सदर बालिका हि उपचारादरम्यान मयत झाली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षु अनिल कांबळे (वय ४, रा.धरणगाव) असे मयत मुलीचे नाव आहे. तिचे वडील अनिल कांबळे हे पत्नी, २ मुले व १ मुलगी हर्षु हिच्यासह राहत होते. मजुरी काम करून अनिल हे परिवाराचा गाडा हाकत होते.(केसीएन) धरणगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या अमळनेर रस्त्यावर पांढरी विहीर परिसराजवळ शुक्रवार दि. २१ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता अनिल कांबळे यांची पत्नी या मुलगी हर्षुसोबत पायी चालत जात होत्या.
त्यावेळी अचानक मागून आलेल्या दुचाकी क्र. एमएच १९ सीसी ७८१० ने बालिकेला जबर धडक दिली. त्यात ती जबर जखमी झाली. तर डोळ्यादेखत मुलीचा अपघात पाहून आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.(केसीएन) जखमी बालिकेला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरु असताना रात्री हर्षुचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
दोन भावांच्या पाठीवरील बहिणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.(केसीएन) सदर घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार दुचाकी चालक नितीन रमेश पाटील (रा. साने नगर, अमळनेर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.