DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
चाळीसगांव: शहरात विकास कामाना सुरूवात झाली आहे.खरच शहर वाशी यांना खुप आनंद झाला.रेल्वे स्टेशन रोडाला चांगले दिवस येणार. रस्त्याची लांबी रुंदी बरोबर मोजणार का? रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. ते काढण्यात येणार का? गरीबांचे फक्त अतिक्रमण वर हातोडा पडणार का? धन दांडगे व राजकीय नेत्यांचा डोक्यावर हात असणाऱ्याचे देखील अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण निघणार का? अधिकाऱ्यावर दबाव यंत्रणेचा वापर करून ते जसे तसे राहणार की काय? राजकीय पुढारी आपल्या कार्यकर्त्याचे अतिक्रमण काढणार का? जनता सर्व पहात आहे कोणाचे अतिक्रमण कुठे आहे.कसे आहे कोणत्या पध्दतीचे आहे. जनता आता जागृत झाली आहे.जनता उघड्या डोळ्यांनी सर्व पहात आहे. वेळ येईल तेव्हा जनता आवाज उठविणारच संबंधित अधिकारी यांनी राजकीय पुढारी यांच्या दबावाखाली काम न करता सरळ मार्गाने काम करावे.जे सत्य आहे.ते सत्य च आहे आपण जनतेच्या टॅक्स मधुन पगार घेतो याचे भान ठेवून काम करावे.फक्त गरीबांच्या अतिक्रमण वर हातोडा न मारता धन दांडगे व राजकीय पुढारी यांच्या कार्यकर्त्यांचे देखील अतिक्रमण असले ते देखील काढावे अशी जनतेकडून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पुढे काय होते ते जनता पहात आहे.