DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- दि.२६ बुधवारी रोजी साक्री तालुक्यातील सतमाने गावातील एका नागरिकाने तत्काळ पोलीस मदत क्रमांक ११२ ला कॉल करुण मस्करी करण्याची बातमी समोर आली आहे. पोलीस तात्काळ मदत प्रणाली दूरध्वनी क्रमांक डायल ११२ वर दुपारी ०१.३० वाजुन ते ०३.५४ मिनिटांनी निजामपूर पोलीस स्टेशन येथे कॉल केला गेला कॉलर नामे भटू पंडितराव पदमोर (वय ३०)रा. सतमाने ता. साक्री जि. धुळे या व्यक्तीने कॉल करुन माहिती देत पोलिसांना सांगितले की, एका ज्योतिषाला काही लोक मारहाण करीत आहे. आपण लवकर घटना स्थळी पोहचावे असे कळवले असता खात्री करण्यासाठी तात्काळ निजामपूर पोलीस स्टेशनचे पो.स.ई गवळी यांच्या आदेशानुसार पो.को.रतन मोरे, पो.को. चव्हाण, पो.को दुरगुडे सह शासकीय वाहनाने सतमाने या गावी रवाना झाले सतमाने गावात पोचल्यानंतर डायल ११२ कॉलर पंडितराव पदमोर याला भेट घेऊन त्या घटने बद्दल विचारपूस केले असतांना कॉलर भटू पदमोर याने उडवा उडवी चे उत्तर देत सांगितले की इथे कुठेच असं झाले नाही, चुकीने कोणी तरी केला असेल कॉल असे सांगण्यात आले सदर घटनेची शहानिशा करून तपासणी कार्यासाठी गावातील पोलीस पाटील,सरपंच व दोन पंचांसह गावात जाऊन त्या घटनेची खात्री केली असता त्या गावात कोठेही असे काही झाले नाही. याबाबत खात्री केली म्हणून कॉलर ने डायल ११२ अतिशय तात्काळ महत्वाची प्रणालीवर खोटी माहिती दिली व प्रशासनाचा वेळ वाया घालविला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील घटनेतील खोटी माहिती देणारा व्यक्ती नामे भटू पंडितरावं पदमोर ह्याने जाणून-बुजून ही माहिती खोटी आहे. या व्यक्तीने डायल ११२ वर कॉल केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर भा.द.वी. कलम १७७ प्रमाणे निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स.पो.नी गायकवाड, पो.स.ई विशाल पाटील, पो.स.इ कोळी यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे. प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे कि, अशी खोटी माहिती देणाऱ्या वरती तात्काळ कारवाई करण्यात येईल.