DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- संजय जाधव
निफाड:- विशालगड च्या पायथ्याशी असलेल्या “गजापूर” गावातील मुस्लिमवाडी येथील दर्गा मसज्जिद व नागरी वस्तीवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याबाबत संविधान हक्क परिषद निफाड तालुक्याच्या वतीने.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
अखंड हिंदुस्तानचे प्रेरणास्थान श्री. छत्रपति शिवाजी महाराजानी अठरापगड जातींना एकत्र घेऊन ज्या पवित्र भूमीवर स्वराज्याची स्थापना केली व छत्रपती शाहू महाराजांनी ज्या राजधानीवर सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन राज्य केले त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर विशालगडा वरील अतिक्रमणाच्या नावावर काही समाजकंटकांनी दर्गा मस्जिद व नागरी वस्तीवर व तसेच मुस्लिम महिला पुरुष बालकावर तलवारी व अन्य शस्त्राने अमानुष हल्ला केला, वाहनाची तोडफोड करून घरे जाळली ही, बाब अतिशय धक्कादायक आणि भयावह आहे हल्ले खोरांवर कायदेशीर कारवाई करून, संबंधित प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून या घटनेचा सूत्रधार शोधून त्यावर कारवाई करण्यात यावी…. अशी मागणी संविधान हक्क परिषद निफाड तालुका उपाध्यक्ष जमिर(वकील भाई)बशिर शेख शहर उपाध्यक्ष शेरखान जमशेद मुलांनी यांनी निफाड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.