अपघातात विभागाचा चालक ठार, दोन जण गंभीर जखमी
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिक:- मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत असताना विभागाचे वाहन हरणुल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले. त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले.
तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेचा पोलीसाकडुन कसून तपास सुरु आहे. लवकरच याबाबत माहिती दिली जाईल असे पोलिस अधिकारी यांच्यातर्फे सांगण्यात आले.