DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- संजय जाधव
निफाड :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या चलो वार्ड चलो पंचायत अभियानाची सुरुवात निफाड येथे रविवार दिनांक 28 जुलै रोजी सुरुवात करण्यात आली.उत्तर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी एहसानजी खान यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव पानगव्हाणे व निफाड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांनी यावेळी अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रत्येक वॉर्डातील व पंचायती मधील समस्या यांची माहिती घेऊन ती भरून घेण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक शिंदे, माजी नगरसेवक आरिफ मणियार, शहराध्यक्ष स्वप्नील बिनायकिया, नंदकिशोर कापसे, तालुका उपाध्यक्ष अलीभाई शेख, तालुका संघटक शेरखान मुलाणी, निफाड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष दिनेश कापसे, खालकर भीमराज साळुंखे, राकेश निकाळे, विकास खडताळे, आरिफ अन्सारी, दीपक शिंदे,गौतम वानखेडे, सिद्धार्थ साळवे, दुर्योधन गांगुर्डे, विशाल साळवे, आकाश जगताप, सागर इप्परदास, सागर धुमाळ, राहुल साळवे, रितेश मोरे, राहुल पगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.