DPT NEWS NETWORK 🗞️✍️
निफाड शहर प्रतिनिधी संजय जाधव
नाशिक:- निफाड बस स्थानकात विद्यार्थिनी मुलींची छेडछाड आणि रोड रोमिओन चा धुडूगुस ही नित्याची बाब ठरू पाहत आहे . निफाड शहरात परिसरातील खेडेगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, यातील काही तरुण-तरुणी बस स्थानकात नको ते चाळे करताना दिसतात त्यामुळे इतर लहान मुले मुली यांच्या बालमानावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असून या रोडरोमीओवर वचक बसावा या दृष्टीने निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने पि आय गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली निफाड नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे यांचे संकल्पनेतून दामिनी पथक तयार करण्यात आले आहे.
ठराविक मुले मुली अनेक वेळा शाळा महाविद्यालयाला दांडी मारून बसस्थानकातील बाकावर बसून नको ते चाळे करतांना दिसून येतात. अशा टवाळखोर रोड रोमीवर वचक बसावा मुलींना भयमुक्त वातावरणात आपले शालेय शिक्षण पूर्ण करता यावे या दृष्टीने निफाड पोलीस स्टेशन ने महत्त्वाचे पाऊल उचलले असून दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याबाबद नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस राजु मनोहर, भारत पवार, सुनील सानप, महिला पोलिस चव्हाणके, शिंदे तसेच वाहतूक नियंत्रक के. एस. लाड, आर के पीठे, सोमनाथ गवळी, तसेच अमोल वडघुले, नंदकुमार कापसे, संजय जाधव, बंटी शिंदे, आशिष मोगल ,भूषण पंडित, आधी नागरिक उपस्थित होते
—————————————-
शालेय विद्यार्थिनी व महिलांनी कोणत्याही संकटाला न घाबरता निफाड पोलीस स्टेशनच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधून आपल्याला मदत मिळू शकते मुलींना कोणी रोडरोमियो टावळखोर त्रास देत असेल तर त्यांनी न घाबरता निर्भीडपणे पोलिसांशी संपर्क साधावा निफाड पोलीस स्टेशन ने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जी दामिनी पथकाची निर्मिती केली हा स्तुत्य उपक्रम असून टवाळखोरांना यामुळे नक्कीच वचक बसेल
अनिल पा. कुंदे
उपनगराध्यक्ष निफाड