नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे शहराच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती नाही.
मुख्यमंत्री व आमदारांनी धुळेकर जनतेला फसविले.


रणजीत राजे भोसले यांचा दावा.

धुळे:- महानगरपालिकेने नव्याने वाढवलेल्या घरपट्टीला महाराष्ट्र सरकारने कोणती स्थगिती दिलेली नाही किंवा रद्द केली नाही. असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री रणजीत राजे भोसले यांनी सांगितले आहे. धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेच्या काळात धुळे शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करात अवाढव्य वाढ केली. लोकांची घरपट्टी आठ ते दहा पटीने वाढविली. त्यावेळी वाढीव घरपट्टी कमी करावी किंवा रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तसेच इतर पक्षांनी सुद्धा आंदोलन केले. परंतु भाजपाने घरपट्टीत सवलत दिली नाही. कोणत्याही नगरसेवकांनी घरपट्टी रद्द करावी असा ठराव महासभेत मांडला नाही. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रचा विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्री पर्यंत भेटीगाठी, पत्रव्यवहार शहरातील विविध नेत्यानी केला. पण त्यालाही यश मिळाले नाही. वलवाडी उपनगरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली, ती पण फेटाळण्यात आली .उलट महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटीसा देण, हरकती घेणे, सुनावणी घेणे आदी काम सुरूच ठेवले.एवढेच नव्हे तर हद्दवाडीतील दहा गावातील मालमत्ता धारक व देवपूर मधील हजारो मालमत्ताधारकाने वाढीव दरानुसार मालमत्ता कर,घरपट्टी वेळेवर भरून टाकलेली आहे. उर्वरित लोकांना सुद्धा वाढीव घरपट्टी प्रमाणेच भरणा करावा लागणार आहे. शहरातील ठराविक मालमत्तांना एक दर व दुसऱ्या मालमत्तांना दुसरा दर असे करता येणार नाही. हे तर्क संगत नाही. हा भेदभाव, गैरव्यवहार, भ्रष्टाचार मानून अधिकारांवर काही कारवाई होऊ शकते. तथापि दोन दिवसांपूर्वी धुळ्याच्या आमदारांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळाली. ती रद्द झाली, जुन्या दराने लागू होईल असे सांगितले. पण ते धांदात खोटे आहे. अशी कोणत्याही प्रकारची स्थगिती महाराष्ट्र शासनाने दिली नाही. असे कोणतेही पत्र महानगरपालिकेला आलेले नाही. जे दिनांक २५ जुलै 2024 चे पत्राचा दाखला दिला जातो. वास्तविक त्या पत्रात फक्त महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतुदी प्रचलित, शासन आदेश, नियमानुसार योग्य ती कारवाई करावी. असे म्हटले आहे. म्हणजेच या पत्रात स्थगिती दिली, रद्द केली असा आदेश नाही. आपण स्वतः मनपाच्या अधिकाऱ्यांना भेटून खात्री करावी.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष रंजीत राजे भोसले

मुख्यमंत्री,आमदारांनी धुळेकर जनतेची दिशाभुल करून फसवणूक केली आहे. दोघांनी स्टंट करून धुळे शहराच्या लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याची काम केलेले आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आमदारांनी आंदोलन केले व व्हिडिओ व्हायरल केले. हे स्वागतर्य आहे. पण हे फक्त राजकीय नाटिका ठरली. मुख्यमंत्र्यांनी फक्त फोनवर बोलून वेळ मारून नेली. कोणताही लेखी आदेश दिला नाही. धुळेकर जनता हुशार आहे. जनतेला सर्व कळत आहे. जोपर्यंत स्थगितीचा किंवा रद्दचा लेखी आदेश येत नाही, तोपर्यंत सुज्ञ धुळेकर शहरातील नागरिकांनी काही राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवू नये. कारण ही भाजपा व एमआयएम पक्षाची मिलीभगत आहे. एका ने मारायचे नाटक करायचे व दुसऱ्याने रडण्याचे नाटक करायचे असे ठरलेले आहे. भाजपा व एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे रणजीत राजे भोसले यांनी म्हटले आहे. यावेळी नंदू यलमामे, राजू डोमाळे, अशोक धुळेकर, ज्ञानेश्वर सोनवणे,भोला साईंदाने,बंटी वाघ, राजू चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!