DTP NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे इचलकरंजी
इचलकरंजी:- न्याय निवाडा लोकनेता फौंडेशन व असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे वतीने कोरोची मधील तसेच ग्रामीण भागातील असंघटित बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेमधील संसार उपयोगी भांडी संच असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकी माने यांनी कोरोची गावचे लोक नियुक्त सरपंच संतोष भोरे, माने कन्स्ट्रक्शन गृप चे संस्थापक प्रल्हाद माने, लोकनेते आण्णा शेट्टी, उदय पाटील, यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना लाभाचे वाटप केले.
यावेळी विकी माने यांनी बांधकाम कामगार अद्याप आपल्या हक्क अधिकार तसेच शासन योजने पासुन लांब आहे. ज्या बांधकाम कामगारांना अजुन न्याय मिळाला नाही त्यांना न्याय देण्यासाठी आणि तत्पर सेवा देण्यासाठी मी बांधील आहे.
बांधकाम कामगार शासन लाभापासून वंचित राहता कामा नये. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सुनिता अशोक माने, असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा विद्या चौगुले यांच्यासह बहुसंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते.