नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19,17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त.


DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी– साईनाथ खंडेराय

नांदेड ग्रामीन पोलिसांची कामगीरी

नांदेड :-  पोलीस अधिक्षक नांदेड अबीनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैद्य धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीन अंतर्गत दिनांक 04/09/2024 रोजी पो.स्टे. नांदेड ग्रामीनचे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि महेश कोरे यांना गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती मिळाली की, बोंडार मार्गे धनेगाव एक आयचर ताटपटरी बांधुन आत मध्ये गोवंश बैल घेवुन कत्तली साठी जात आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरिष्ठाना देवुन सोबत अंमलदार पोहेकॉ/1812 शेख सत्तार, पोकों पचलिंग यांना घेवुन टापरे चौक येथे गेले असता समोरूण एक आयचर क्रमांक MH20EL 7887 हा येत असलेला दिसला त्यास हात दाखवुन वेळ पाहटे 4.00 वाजताचे सुमारास सदर वाहण थांबविले व ताटपटरी काढुन आत मध्ये पाहीले असता सदर आयचर मध्ये गोवंश जातीचे एकुन 18 बैल आतमध्ये दिसले त्यावरूण आरोपी क्र 1) शेख फिरोज रब्बानी वय 25 वर्ष व्यवसाय चालक 2) कुरेशी अबुजर बशीर वय 24 वर्ष व्यवसाय मजुरी 3) जावेद अजीज शेख वय 35 वर्ष व्यवसाय मजुरी 4) शेख गुलाम रसुल शेख पिराण सर्व रा.बोरगाव सारवनी ता. सिल्लोड जि.संभाजी नगर.5) हबीब खान हुसेन खान रा. जळगाव असे नमुद पाच आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीन येथे गु.र.न. 799/2024 कलम 5,5 (अ) 5 (ब), 9.9 (अ) (ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षन अधिनियम 1976 सुधारणा 2015 सहकलम 11 (1) (घ) (ड) प्रमाणे दाखल झाला आहे. सदर गुन्हयातील 18 गोवंश जातीचे बैल एकुन किंमत 4,17,000/-रू व एक आयचर किंमत 15,00,000/- रू असा एकुन 19,17,000/-रूपयाचा माल जप्त करूण सदर जनावरे त्याचे जिवीताचे काळजीचे उद्देशाने गोशाळा येथे पुढील पालन पोषणाकरीता दाखल करण्यात आले आहेत.

सदर कामगीरी ही अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड,  सुरज गुरव अपर पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागाग इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली नागनाथ आयलाने पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड, ग्रामीन गुन्हे शोध पथकाचे पोउपनि महेश कोरे, पोहेकॉ/1812 शेख सतार पोकों पचलिंग यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:35 pm, January 12, 2025
temperature icon 26°C
छितरे हुए बादल
Humidity 40 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 21 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:09 am
Sunset: 6:07 pm
Translate »
error: Content is protected !!