DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- रमेश सुर्गलोड
बिलोली:- आज घडीला बघायला गेलं तर बिलोली मध्ये कोणाला भीतीच राहिली नाही प्रशासनाची अवैध धंदे करणारे रेतीवाले दारू, शिंदी, जुगार, क्लब, आता गुडगुडी हा पण खेळ समोर आलेला आहे.
बिलोली तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाची काही भीतीच राहिलेले नाही की काय? असं सामान्य माणसांना वाटत आहे.
पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अवैध धंदे 15 ऑगस्ट आगोदर बंद करण्याची चेतावणी दिली होती.
सध्या ठिक ठिकाणी पोलिस उप महानिरीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत अवैध धंद्यावर कारवाई सत्र सुरू असताना बिलोली शहरात भरणा-या जनावरांच्या बाजारात गुडगुडी नामक जुगार बिंधास्त चालू आहे.
गोर गरीब शेतकरी आर्थिक संकटास तोंड देण्यासाठी आपले पशुधन गाई, म्हैस, शेळी, मेंढी विविध जनावरे विकण्यासाठी आणतात आणि योग्य दर मिळत नसला तरी आर्थिक अडचणी मुळे कमी किंमतीत विकतात गरीब शेतक-याच्या याच गोष्टीचा फायदा हे जुगार चालवणारे घेतात. आगोदर शेतकऱ्यांना पैसे डबल करण्याचे आमिष दाखवले जाते व हळूहळू शेतकऱ्यांचे पुर्ण पैसे या जुगारात काढुन घेतले जातात अशा प्रकारे प्रत्येक बाजारी अनेक शेतकरी लुटले गेले आहेत. शेतकरी आजुबाजुच्या खेड्यातील असल्या मुळे त्यांचा विरोध ही करू शकत नाहीत
हा जुगार बाजार असल्या दिवशी सकाळी सकाळी चालतो यात बाहेर गावातील अनोळखी लोकांना आणुन स्थानिक जुगार चालकाच्या देखरेख खाली चालतो.
आता मात्र सर्व शेतकऱ्यांची सर्वसामान्य नागरिकांची ह्या जुगार चालकावर कारवाईची मागणी होत आहे.