DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी. प्रा नागेंद्र जाधव.
कोल्हापूर :- देवरवाडी (ता. चंदगड) ग्रामपंचायतीची सलग तीन महिने मासिक सभा व जानेवारी २०२३ मध्ये ग्रामसभाच न घेतल्याचा ठपका ठेऊन सरपंच यांना अपात्र तर ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
सरपंच गिताजंली शंकर सुतार यांनी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिने सलग तीन मासिक सभा व जानेवारी २०२३ ची ग्रामसभा घेतली नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य असलेल्या विरोधी तक्रारदार यांनी 27 एप्रिल, 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्याची चौकशी केली. यामध्ये सरपंच दोषी असल्याची माहिती समोर येताच जिल्हाधिका-यांनी सरपंचांना अपात्र ठरवले आहे तर ग्रामसेवक व्ही. पी. नाईक यांनी १५ ऑगस्टची तहकूब सभा तसेच जानेवारी, फेब्रुवारी व मार्चची मासिक सभा विहित मुदतीत घेतली नाही. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. मात्र जिल्हाधिकारी यांचा निर्णय पक्षपाती, एकांगी असून मी महिला सरपंच असल्याने तसेच आम्ही मांडलेली बाजू विचारत न घेता, एकतर्फी निर्णय दिलेला आहे. हा निकाल अन्यायी असून लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. हा राजकीय द्वेष व राजकिय षढयंत्राचा भाग असल्याचा आरोप सरपंच गीतांजली सुतार यांनी केला आहे.