नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अक्कलपाडा उजव्या कालव्याच्या गळतीने शेतकरी परेशान, देऊर परिसरातील शेतकऱ्यांनी केले निदर्शने

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- संकेत बागरेचा नेर

धुळे:- अक्कलपाडा उजव्या कालव्याच्या गळतीने शेत रस्त्याची लागली वाट
धुळे तालुक्यातील देऊर परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी केली निदर्शने
अक्कलपाडा धरणातून उजव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या जलसेतू (मोरींना) पाण्याची गळती सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन केले. महिला शेतकऱ्यांनीही या निदर्शनामध्ये सहभाग घेतला. पाटाची गळती थांबलीच पाहिजे, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळालाच पाहिजे. ही प्रामुख्याने मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली. पाटबंधारे विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त करून घोषणा दिल्या. पाटाची गळती
थांबून शेती रस्त्याचे काम लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी या वेळी लोकमत’शी बोलताना दिला आहे. ‘
गेल्या दोन दिवसांपूर्वी गळतीच्या ठिकाणी बैलजोडी चिखलात फसली. मोठ्या कष्टाने बैलजोडीचा जीव वाचवण्यात यश आले. तसेच कांदा ट्रॅक्टरही चिखलात रुतले. जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. अशी दररोजची तारेवरची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. भदाणे गावापर्यंतचे शेतकरी रेती, चिखलातून जाणे येणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वच मजूर व शेतकरी त्रस्त झाले आहेत. मजूरही शेतात पायी येण्यास तयार नाहीत. कपाशी वेचणी, मका तोडणी, मका कापणी कशी
करावी. पाटाखालून जाण्या येण्यासाठीच्या मोरीत रेती व मातीचा गाळ साठल्याने मोरीची उंची कमी झाली आहे. कुठलेही वाहन, मका गहू काढणे मशीन शेतापर्यंत पोहोचू शकत नाही. शेतकरी वर्ग कंटाळला आहे. मेटाकुटीला आला आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींना लेखी निवेदने शेतकऱ्यांनी दिली आहेत. पाटमोरी जवळ प्रत्यक्ष पाहणी केली. पाटबंधारे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून पाणी गळती बंद होत नाही. उलट जास्तच पाणी गळत असल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. तरी गळती बंद होत नाही व रस्त्याची दुरुस्ती करून मिळत नाही. त्यामुळे पाटमोरी तोडफोड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला
आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!