DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदिले
उमरेड:- शिवस्नेह गणेश मंडळातर्फे स्थापित ‘उमरेडचा राजा’ म्हणून प्रसिद्ध गणेशाला दर्शनी धवड यांनी रविवारी भेट दिली. यावेळी मंडळाकडून आयोजित महारक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या युवकांना धवड यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
शिवस्नेह गणेश मंडळातर्फे येथील सत्यम सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उमरेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 1062 दात्त्यांनी शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले. सकाळी साडेआठ वाजता सुरु झालेला रक्तदानाचा कार्यक्रम रात्रीचे नऊ वाजतापर्यंत सुरु होता. विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांची शिबिराला लक्षनीय उपस्थिती होती.
दर्शनी स्वानंद धवड यांनी शिबिराला भेट देत रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. तसेच आयोजक शिवस्नेह गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.