DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संजय जाधव निफाड
निफाड:- युवा ध्येय व युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे मा . शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते एस बी देशमुख यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे हे होते यावेळी प्रमुख वक्ते दिनेश आदलिंग लेखक, प्रमुख आकर्षण सिने अभिनेता रिशी जोरवर ,अरुण धामणे मा. शिक्षणाधिकारी अहमदनगर, परशुराम पावसे मा . शिक्षणाधिकारी अहमदनगर, संदीप वाघचौरे शिक्षण तज्ञ, श्रीकृष्ण कुलकर्णी भोसला मिलिटरी स्कूल . युवा ध्येय फाउंडेशनचे अध्यक्ष लहानु सदगीर हे उपस्थित होते एस बी देशमुख यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय ध्येय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांनी म्हणाले की शिक्षण क्षेत्रात समस्यांना न शोधता पर्याय सुचवले पाहिजेत आणि हे पर्याय सुचविण्याचे काम मुख्याध्यापक प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगले करत असतात म्हणून या पुरस्काराचे महत्त्व अनमोल आहे पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून राष्ट्र उभे राहते म्हणून पुरस्कार महत्त्वाचे आहेत हे पुरस्कार देताना कुठल्याही प्रकारचे प्रस्ताव न मागवता काम बघून हे पुरस्कार दिल्याचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना वाटतो.या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.