नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निफाड तालुक्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी  असलेल्या पतसंस्थेच्या यशशिखराचा घेतलेला आढावा…… 

 DPT NEWS NETWORK  ✍️   प्रतिनिधी- संजय जाधव   

निफाड:- निफाड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या शिक्षक नेते मा. श्री.शिवाजीराजे निरगुडे बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन दि.६ रोजी होत आहे त्यानिमित्ताने पतसंस्थेच्या यशशिखराचा घेतलेला आढावा……

आपण ज्या पेशात व समाजात काम करत आहोत त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही उदात्त भावना डोळ्यासमोर ठेवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हित डोक्यासमोर ठेवून साधारण तेवीस वर्षापुर्वी दि.१६ ऑक्टोबर २००० ला दुरगामी विचारसरणीचे शिक्षक नेते शिवाजीराजे निरगुडे यांनी कैलास भारती, बी.वाय. सोनवणे व मनोज निकम यांना बरोबर घेवुन पतसंस्थेची मोठ्या कष्टाने मूहर्तमेढ रोवली.
शिक्षक नेते श्री शिवाजीराजे निरगुडे यांनी आजतगायत  नाशिक जिल्हा टी.डी.एफ चे अध्यक्ष व उपाध्यक्ष, नाशिक विभाग टी.डी.एफ संघटनेचे उपाध्यक्ष, एन. डी. एस.टी सोसायटीचे चेअरमन, निफाड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे सदस्य, निफाड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, नाशिक जिल्हा शारदादेवी पतसंस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक, निफाड तालुका एज्युकेशन संस्थेचे सेवक संचालक, नाशिक जिल्हा शिक्षक कृती समन्वय समितीचे मार्गदर्शक, पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक आदी विविध महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थितपणे पार पाडून अनेकांना सहकार्य केलेले असून निफाड माध्यमिक पतसंस्थेचे सुरुवातीच्या काळात एकशे एक सभासदांपासून सुरुवात झाली. तसेच पंचवीस हजार रुपये कर्ज मर्यादेने सुरुवात झालेली संस्था आज सभासदांना वीस लाख दिर्घकर्ज, पन्नास हजार आकस्मित कर्ज देणारी तालुका कार्यक्षेत्र असणारी एकमेव पतसंस्था ठरली आहे.त्याचबरोबर मेंबर वेल्फेअर अंतर्गत संस्थेने सभासदांचा रुपये अठरा लाखाचा अपघात विमा काढलेला असून संस्थेच्या एखाद्या सभासदाचे अकाली निधन झाल्यास रु. दोन लाखापर्यंत कर्ज देखील माफ करण्यात येते. सभासदांच्या आई, वडील, अविवाहीत मुलगा,मुलगी यांच्या मृत्यू समयी अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांची दिली जाते. तसेच सभासद अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी होवुन फॅक्चर झाल्यास दोन हजार रुपयांची मदत संस्थेमार्फत दिली जाते.याव्यतिरिक्त सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव, आदर्श गुणवंत सभासदांचा गुणगौरव, सेवानिवृत्त सभासदांचा यथोचीत सत्कार, सभासदांना भेटवस्तू, सभासदांची विशेष वैद्यकीय आरोग्य तपासणी, संस्थेचा सभासदाचे अकाली निधन झाल्यास कुंटुबियांस संस्थेकडून तातडीची दहा हजार रुपयांची मदतही दिली जाते. असे संस्थेचे सभासदांसाठी विविध स्वरूपाचे नाविन्यपूर्ण उपक्रम असून सध्याच्या परिस्थितीत संस्थेने अंदाजे पंचेचाळीस लाख रुपये खर्च करुन स्वमालकीचे शिक्षक नेते मा.श्री. शिवाजीराजे निरगुडे बहुउद्देशिय सभागृह बांधले आहे. खऱ्या अर्थाने “इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगला फुलला, मोगरा फुलला” या पंक्तीप्रमाणे संस्थेचा प्रगतीचा आलेख हा दिवसेंदिवस उंचावत आहे.
संस्थेच्या नूतन सभासगृहाचे उद्घाटन व नामकरण सोहळा रविवार दि.०६/१०/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता गायत्री नगर, पिंपळगाव बसवंत रोड येथे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे संचालक खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून याप्रसंगी विशेष अतिथी म्हणुन माजी आमदार अनिल कदम, सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, सरपंच पिंपळगाव बसवंत चे सरपंच भास्करराव बनकर, न्या. रानडे वि.प्र.मंडळाचे सचिव रतन पाटील वडघुले, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक अंजिक्य वाघ, कृउबा समिती नवी मुंबई चे संचालक जयदत्त होळकर, युवा उद्योजक शंतनू  पाटील, निफाड चे सहाय्यक निंबधक कांतीलाल गायकवाड, म.रा.माध्य.शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, म.रा.माध्य. शिक्षक संघांचे कार्यवाह शालीग्राम भिरुड,जळगाव जिल्हा टि.डी एफ.चे अध्यक्ष आर.एच. बाविस्कर, नाशिक चे शिक्षक नेते बाळासाहेब सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या विशेष उपस्थित सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे.याप्रसंगी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक शिक्षक नेते शिवाजीराजे निरगुडे, संस्थापक अध्यक्ष कैलास भारती, विद्यमान चेअरमन रामराव बनकर, उपाध्यक्षा सोनाली होळकर, कार्यवाह बाळासाहेब गुंजाळ, संचालक तथा खासदार भास्करराव भगरे, बाळासाहेब सोनवणे,नगरसेवक तथा संचालक साहेबराव बर्डे,किरण जाधव,गणेश महाले,राहुल दवते, भगीरथ सोनवणे, बाळकृष्ण वाजे, संचालिका हेमलता जाधव, स्वि. संचालक विलास दखणे, हेमंत खैरनार यांसह व्यवस्थापक रतन दिवटे व ज्ञानेश्वर धाटबळे आदींनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:58 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!