DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- संजय जाधव
—————————————-
नगरपंचायतला पन्नास लाखांचे बक्षीस तर राज्यात विसावा क्रमांक
निफाड:- माझी वसुंधरा अभियानाच्या चौथ्या टप्प्यात निफाड नगरपंचायतने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला असून महाराष्ट्रात विसावा क्रमांक राखत पन्नास लाखांचे बक्षीस जिंकले आहे.
राज्य शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन ऑक्टोबर दोन हजार वीस पासून माजी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे, शहरी तथा ग्रामीण अशा दोन्ही गटात निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित उपक्रमांचा यात समावेश आहे, या अभियानाच्या चौथ्या टप्प्यात यावर्षी निफाड नगरपंचायतने दुसरा क्रमांक पटकावला, निफाड नगरपंचायतने सलग चौथ्या वर्षीही या अभियानात चांगली कामगिरी केली असून मागील वर्षी अभियानात विभागात तिसरा क्रमांक होता. नगरपंचायत चे मुख्याधिकारी अमोल चौधरी यांच्यासह या अभियानासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता व नोडल अधिकारी भाग्यश्री सोनवणे, स्वच्छता निरीक्षक विनोद त्रिभुवन, शरद काकुळते, प्रवीण पठाडे, सुनील गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले तसेच शहरातील शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.