DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- शांताराम दुनबळे
नाशिक:- चांदवड तालुक्यातील दिघवद गावच्या शिवारातील गांगुर्डे वस्तीवर सव्वा दोन वर्षाचा लहान बाळ विहिरीत पडलं त्याला वाचवण्यासाठी गेलेली आई देखील विहिरीत पडली या दुर्दैवी घटनेत आई व मुला चा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
दिघवद येथील गांगुर्डे वस्ती येथील शिवांश दौलत गांगुर्डे (२ वर्ष २ महिने) सकाळी ९ वाजता खेळत होता. खेळता खेळता तो विहिरी जवळ गेला असता तो विहिरीत पडला. त्याला वाचवायला त्याची आई पूजा दौलत गांगुर्डे (२७) या पळत गेल्या. त्यांनी पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी खूप आटापिटा केल्या. मात्र त्या हाताने दिव्यांग असल्याने त्या देखील विहिरीत पडल्या. विहिरीत पाणी असल्याने आई व मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीत पाणी प्रचंड असल्याने पूजा व शिवांश यांचा शोध घेणे अवघड झाले होते. तब्बल तीन ते चार तासानंतर पूजा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तरीदेखील शिवांशचा मृतदेह सापडला नाही. यावेळी विहिरीतील पाणी उपसा करण्यात आला तरीदेखील सायंकाळ पर्यंत शिवांशचा मृतदेह सापडला नव्हता. पूजा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे आदीसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.