DPT NEWS NETWORK 🗞️✍️ 🗞️दर्शन पोलीस टाईम प्रतिनिधि:- संकेत बागरेचा
धुळे:- बोरकुंड ता.धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते, रुग्णमित्र,युवा उद्योजक, भाजपाचे निष्ठावंत प्रदेश पदाधिकारी, जितेंद्र जैन बंब यांना सालाबदाप्रमाणे यावर्षीही “मोतीबिंदू शिबिर संयोजक गौरव २०२४” पुरस्काराने कमलीनी वाणी हॉस्पिटल, शारदा नेत्रालय धुळे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. शारदा नेत्रालयाच्या स्थापनेपासून मागील २० वर्षापासून जितेंद्र जैन बंब हे नेत्रलयाच्या विविध शिबिर, कार्यक्रमला आपला सहभाग नोंदवून आपल्या बोरी परिसरातील, धुळे तालुक्यातील रुग्णांना त्याचा विनामूल्य कसा फायदा करून देता येईल त्याबद्दल ते सदैव तत्पर असतात, मागील २० वर्षात त्यांनी शेकडो शिबिरांचे आयोजन केले व त्या शिबिरातून गरजू रुग्णांना हजारो मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा खारीचा वाटा असतो. मात्र शिबिराप्रमाणेच ते परिसरातील रुग्णांना विविध आजारांच्या समस्यांना समजून धुळे, संभाजीनगर, नाशिक, शिर्डी, मुंबई येथील हॉस्पिटल मधील रुग्णमित्र यांच्या संपर्कात असतात व आपल्या परिसरातील तालुक्यातील रुग्णांची रुग्ण सेवा कशी करता येईल त्यासाठी ते सदैव तत्पर असतात त्यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना रुग्णसेवा ते करीत असतात. त्यांचे शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रात निगडित असल्यामुळे त्यांनी फार्मसीचे उच्च शिक्षण विदेशातून घेतल्यामुळे त्यांना त्याचे ज्ञान आहे त्यामुळे ते रुग्णांना नेहमी वैद्यकीय सल्ले देऊन समाधान करण्याचे कार्य करीत असतात.
त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन सालाबदाप्रमाणे यावर्षीही शारदा नेत्रालय धुळे च्या वतीने त्यांना मोतीबिंदू “शिबिर संयोजक गौरव २०२४” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले…
यावेळी शारदा नेत्रालयाचे विश्वस्त
मयूर दुतिया, देवेंद्र शाह, दीपक मेहता, श्रीपाल मुनोत, डॉ.मोबशिर अन्वर, डॉ रमा घोनमोडे, हिरल देसाई (अडमिन शारदा नेत्रालय), अमोल वानखेडकर (शिबिर प्रमुख)भाजपाचे नेते किशोर सिंगवी, रुग्णमित्र, दिव्यांग मित्र रामलाल जैन,नेत्रालयातील कर्मचारी, तालुक्यातील रुग्णसेवक, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.