DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :- धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) गावात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दसरा सणाच्या एक दिवस अगोदर सर्व प्रथम ग्रामदैवत वेडू माय मातेच्या प्रांगणात सकाळी आठ वाजेच्या सुमारास ग्रामसुधार मंडळाच्या वतीने गावात सुख शांती लाभो यासाठी पाच जोडपे कडून होम पूजेचे आयोजन करण्यात आले होते व तसेच संध्याकाळी गावातील कै.अरविंद चौक येथे ९ जोडप्यांकडून दुर्गा मातेची पूजा,आरती करण्यात आली व रात्री ६ ते ९ वाजे पर्यंत कै.अरविंद चौक परिसरातील तरुण मित्र मंडळ व आदिवासी समाजाच्या आदिवासी मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी हजारो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शेवाळी गावासह मुंबई,पुणे,नाशिक,धुळे येथील नागरिकांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे आदिवासी वस्ती मधील आदिवासी मित्र मंडळ व गावातील कै.अरविंद चौक मधील तरूण मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी भंडारा देण्याची परंपरा कायम ठेवत या ठिकाणी कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, कोणी श्रीमंत नाही तर कोणी गरीब नाही अशी भावना समोर ठेवून सर्व नागरिकांनी भारतीय पद्धतीने भंडाराचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील सर्व तरुण मित्र मंडळांनी पुढाकार घेतला होता.