DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- संकेत बागरेचा नेर
धुळे:- शहरातील एसआरपीएफ पेट्रोल पंपासमोर एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच कारमधील चालकासह दोघांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करत तात्काळ बाहेर पडले, यावेळी पाहता क्षणीच आधीचे रुद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कार आगीच्या भक्ष स्थानी सापडली, आग लागल्याचे लक्षात येताच धुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटना घडली तेव्हा कार जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या कडेला उभी होती. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि आग विझवली. मोठा अनर्थ पडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.