DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- साक्री तालुक्यातील जैताने शिवारातील युवा शेतकरी आपल्या शेतामध्ये शेळ्यांना चारा टाकण्यासाठी गेला असता विहिरी जवळ पाय घसरून विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दि.१६ रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील रोजगाव जवळ असलेल्या स्वतःच्या शेतात मोहसीन नावाच्या युवक हा आपल्या शेतात शेळ्यांना चारा पाणी साठी करीत असतांना विहिरीजवळ पाय घसरून विहिरीत पडला असता त्याचा दुर्देवी मृत्यू झाला पारिसरात मोठ्या प्रमाणात दुःख पसरले असून आज त्याची दि.१७ रोजी अंत्यविधी करण्यात आली.
अधिक माहिती अशी कि मोहसीन हा स्वतःच्या शेतात चारा पाणी करण्यासाठी रोजच्या प्रमाणे गेला होता दुपारी जेवणाची वेळ झाली असतांना त्याला त्याच्या भावाने जेवणासाठी त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद दाखवत होता म्हणून त्याला बोलवीण्यासाठी गेले असता तो तेथे दिसून आला नाही म्हणून त्याचा शोध घेण्यास सुरवात केली असता त्याची चप्पल विहरी जवळ आढळून आली असता त्यांना मोहसीन विहिरीत पडला असल्याचा संशय आल्यावरून त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली व पोलिसांना देखील कळवले युवक बुडाल्याची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती काही युवकाच्या मदतीतून बुडालेल्या युवकाच्या मृतदेह विहिरीतून लोखण्डी बिलाडीच्या सह्याने तब्ब्ल तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृत देह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता सदर घटनेची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी मृतदेह बघून घटनास्थळी रोष व्यक्त केला तसेच बघणाऱ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी दिसून आली. मोहसीन च्या मागे तीन मूल, व तीन भाऊ असा परिवार आहे.मोहसीन चा मित्रपरिवार मोठा असून अंत्यविधीसाठी परिसरातील हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.