DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- निवास गागडे
कोल्हापुर :- फिर्यादी शिवम रमेश गिरी वय वर्ष 21 राधाकृष्ण नगर गल्ली नंबर 2 शहापूर इचलकरंजी याने दिलेल्या जबाब वरून म्हसोबा मंदिर विक्रम नगर व बालाजी चौक इचलकरंजी या ठिकाणी फिर्यादीचा लहान भाऊ रोहित सुरेश गिरी हा विक्रम नगर येथील एन एस जिम येथे व्यायाम करून घरी जात असताना सोहेल नदाफ व याचे बरोबर असलेला अनोळखी पुरुष इसम याने तू आम्हाला ओळखतो का असे विचारले असता रोहित सुरेश गिरी यांनी त्यास नाही असे उत्तर दिले. त्यावेळी मोटर सायकल वरून उतरून सोहेल नदाफ बरोबर असलेला अनोळखी पुरुष इसमाने रोहित गिरी यास चापट मारली. त्यावेळी रोहित याने फिर्यादी भाऊ शिवम रमेश गिरी यास बोलावून घेतले फिर्यादी तेथे आल्यानंतर तेथे एका इसमाने मारहाण करणारे इसम पुढच्या चौकात आहे असे सांगितल्यावर फिर्यादी व त्याचा भाऊ रोहित सुरेश गिरी हे पुढच्या चौकात गेले असता सोहेल नदाफ याचे बरोबर असणारे त्याचे मित्र त्यांनी त्याचा भाऊ रोहित सुरेश गिरी यास पकडले म्हणून फिर्यादी शिवम गिरी हा सोडविणे करता गेले असता. त्यांच्यापैकी कोणीतरी एकाने फिर्यादीचे डोक्यात विटेने मारहाण केली व त्यापैकी एकाने फिर्यादीचे भाऊ रोहित गिरी यास याचे डावी हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यावेळी आयजीएम हॉस्पिटल येथे ऍडमिट केले असताना. दिलेल्या जबाबावरून इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 414/2024 बी एन एस कलम 189 (2) 191 (2) 191 (3) 118 (1) म पोकाक 135 प्रमाणे दाखल झाले असून त्यातील नऊ जणांच्या वर गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील वापरलेले हत्यार वीट व चाकू हस्तगत केले आहे.