DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – विकी माने / नारायण कांबळे
कोल्हापुर:- हातकणंगले पोलिस ठाणे मधिल पोलिस हवालदार रविकांत शिंदे याला सोळा हजार रूपयाची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांचे कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे किराणा मालाचे दुकान आहे. तक्रारदार हे किराणा मालाचे दुकानात गुटखा विक्री करतात याकरिता हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांना साधारण एक महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यात भेटण्यास बोलावून घेऊन तक्रारदार यांच्याकडे तुम्ही गुटखा विक्री करतात तुमच्यावर कायदेशीर कारवाई न करता गुटखा विक्री करायचे असेल तर मला प्रति महिना 10,000 रुपये द्यावे लागतील नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो असे सांगितले. त्यानंतर दिनांक 15/10/2024 रोजी संध्याकाळी 04.45 वाजता 9421251635 या मोबाईल नंबर वरून तक्रारदार यांचे फोनवर फोन करून तक्रारदार यांना पोलीस ठाणे भेटण्यास बोलावे. तक्रारदार भेटण्यास गेले असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे गुटखा विक्री करायचे असल्यास प्रति महिना 10,000 रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 4,000 रुपये प्रति महिना प्रमाणे मागील चार महिन्याचे मिळून 16,000 हजार रुपयाची तक्रारदार यांच्याकडे मागणी केल्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस हवालदार रविकांत शिंदे याचे लाच मागणीची पडताळणी केली असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 16,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले. तक्रारदार यांच्याकडे 16,000 रूपयेची मागणी केलेली स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बापु साळुंके, पोलिस हवालदार सुनील घोसाळकर, संदीप काशीद, सचिन पाटील, संदीप पवार, कुराडे यांनी कामगीरी केली.