DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – संजय दिंडे कोल्हापूर
कोल्हापूर :- कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २५ हजाराची लाच स्विकारताना जिएसटी अधिकारी तथा राज्य कर अधिकारी निवास श्रीपती पाटील रा. न्यु पॅलेस मागे नागाळा पार्क कोल्हापूर याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणातील तक्रारदार
यांचे ऑइल व ग्रीस रिपॅकिंग करण्याची कंपनी आहे. निवास पाटील यांनी तक्रारदार यांना कंपनीची कागदपत्रे जीएसटी विभागाचे नियमाप्रमाणे आहेत का याबाबत नोटीस पाठवली होती. दरम्यान मुदतीत निवास पाटील यांनी तक्रारदार यांच्या कंपनीस भेट देऊन त्यांचे कंपनीचा बँकेचा अकाउंट नंबर जीएसटी पोर्टलला नोंदवला नाही म्हणुन तक्रारदार यांना दीड ते दोन लाख रुपये दंड होईल असे सांगितले . दंड नको असेल तर 25,000 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली . तक्रारदार यांचेकडुन 25,000 हजार ररुपये स्वीकारताना निवास पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले . त्यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पोलीस उप अधीक्षीका वैष्णवी पाटील यांनी सांगितले .
या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला,
पोलिस हेड कॉन्सटेबल अजय चव्हाण,
पोलिस हेड कॉन्सटेबल विकास माने, सुनील घोसाळकर, पोलिस नाईक सुधीर पाटील,
सचिन पाटील, पोलिस कॉन्सटेबल कृष्णा पाटील,चालक कुराडे,पोलिस कॉन्सटेबल दावणे यांचे योगदान लागले.