DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- गुलाबराव भदाणे
जळगाव : ऑर्किड नेचर फाऊंडेशनची वार्षिक सभा संपन्न – रानपूसा फार्म हाउस, कंडारी रोड, येथे संपन्न होऊन- मावळते अध्यक्ष किशोर महाजन यांनी आपल्या पदाची सूत्र पुढील 3. वर्षासाठी राजेंद्र एन कुलकर्णी यांना प्रदान केली तर सचिव पदाची सूत्रे नानासाहेब वाघ यांनी सुनीता सोमनाथ महाजन यांच्या कडे पदभार सुपूर्त केलां खजिनदार पदी नितिन अट्रावलकर यांची निवड झाली. दिगंबर महाजन यांनी पक्षाचे स्थलांतर व त्यांचे आयुष्य या विषयी मार्गदर्शन केले दिलीप भारंभे सर यांनी, तसेच सौ. सुनिता महाजन यांनी पर्यावरण रक्षण या संबंधीचे विचार सांगितले सभेच्या सुरवातीस श्री- नाना वाघ यांनी दिवंगत सदस्य – संजय गुळवे, अरुण देशपांडे, आर-ए चौधरी सर यांना श्रद्धांजली वाहीली नंतर संस्थेचे आधार स्तम्भ -प्रा. वसंत सोनावणे, दिलीपजी चोपडा, RA पाटील, दिपकजी तांबोळी, अविनाश भोळे, जयंत राणे, किरण व हेमलता खडके, जयंत राणे, आरती महाजन यांचा सत्कार करण्यात आला
श्रीरंग कुलकर्णी दरवर्षी संस्थेचा ऑडिट रिपोर्ट फ्री मध्ये करून देतात यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास ऑर्किड नेचर क्लबचे 30-35 सदस्य उपस्थित होते शशिकांत पाटील, दीपक तांबोळी, नाना वाघ, दिगंबर वाणी, अर्चना अठरावलकर, हर्षल कुलकर्णी, रवींद्र पाटील, दिगंबर कोल्हें, किरण व हेमलता खडके, अजित काळे, अविनाश भोळे, जयवंत राणे, दिलीप भारंबे, ललित रडे व इतर महिला सदस्यांची उपस्थिती होती आर्किट नेचर संस्था दरवर्षी वृक्षारोपण, फळवाटप, पक्षी निरीक्षण, निसर्ग सहली, प्लास्टिक निर्मूलन चर्चासत्र असे विविध निसर्गपूरक कार्यक्रम वर्षभर राबवत असते ज्यांना वरील विषयात आवड व रुची असेल त्यांना संस्थेचे कायमचे सभासदसत्व देण्यात येईल जानेवारी महिन्यात बारीपाडा व तोरणमाळ येथील सहलींचे आयोजन नक्की झालेले आहे.
ऑर्किड नेचर संस्थेचे PRO जनसंपर्क अधिकारी व प्रसिद्धी प्रमुख म्हणून गिरीश रमणलाल भावसार यांची नियुक्ती नवनियुक्त अध्यक्ष कुलकर्णी यांनी जाहीर केली आहे.