DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🗞️✍️ प्रतिनिधी:- पांडुरंग माने
कुर्डुवाडी:- मुंबईहून सी एस टी-लातूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे सुमारे ३लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले.ही घटना मंगळवार दिनांक १०/१२/२०२४ रोजी रात्री १२:३० ते सकाळी ६:३० च्या दरम्यान घडली.याबाबत मुहम्मद अहमद खान रा.भोईसर जिल्हा पालघर यांनी येथील लोहमार्ग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.याबाबत माहिती अशी की,फिर्यादी हे मेहुण्याच्या लग्नासाठी सी एस टी येथून दि.१० रोजी सी एस टी-लातूर एक्स्प्रेसने(गाडी नं.२२१०७) कोच नं.एस ७ मधून प्रवास करत होते.दरम्यान लातूर येथे सकाळी ६:३० वा.समान घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर फिर्यादीच्या पत्नीने बॅगची चेन उघडी असल्याचे पाहिले. त्यानंतर ही बॅग तपासून पाहिली असता बॅग मधील दागिने चोरीला गेले असल्याचे लक्षात आले. त्यामध्ये २ लाख रुपये किमतीचे पावणे तीन तोळे वजनाचे गळ्यातील सोन्याचे नेकलेस, ७० हजार रुपये किमतीचे ९ ग्रॅम वजनाचे कानातील सुई धागा, २१ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,८४ हजार रुपये किमतीचे १ तोळा वजनाचे कानातील असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवून नेला. सीसीटीएनसी प्रणालीद्वारे दि.१४/१०/२०२४ रोजी रात्री उशिराने कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीसात फिर्याद दाखल झाली आहे. पुढील तपास पो. नि. महेश भावीकट्टी हे करत आहेत.