DPT NEWS NETWORK 🗞️✍️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे/नारायण कांबळे
इचलकरंजी:- लाच मागितल्या प्रकरणी इचलकरंजी भुमापन अधिकारी दुष्यंत कोळी याला कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या पथकाने कारवाई केली. यातील तक्रारदार यांचे व सहहिस्सेदार यांचे मालकीचे मौजे शहापूर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे गट नं.४५४, सि.स.नं.१९०२१ मध्ये प्लॉट नं.२७,२८,२९,३० असे प्लॉट असून त्यापैकी प्लॉट नं.२७,३० व प्लॉट नं. २८.२९ असे प्लॉट सामीलीकरण होण्याकरीता तकारदार यांनी नगर भूमापन अधिकारी कार्यालय, इचलकरंजी यांचे कार्यालयाकडे दि.२२/०७/२०२४ रोजी अर्ज केले होते. सदरचे अर्ज नगर भूमापन कार्यालयातील एका कर्मचारी यांचेकडे असल्याने तकारदार यांनी त्यांचेकडे चौकशी केली, त्यावेळी सदर कर्मचारी यांने तकारदार यांचे दोन्ही अर्ज व प्रकरणे ही जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयाकडे पाठवून त्याची प्रत तकारदार यांना दिली. होती. त्यानंतर दि.१०/०९/२०२४ रोजी कर्मचारी याने तकारदार यांना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयालयातील तुमचे अर्ज ज्या टेबलला आहेत त्या टेबल चा चार्जही माझेकडे आहे. मी तेथुन तुमच्या अर्जावर मंजूरी घेवून आणू शकतो, त्याकरीता ३०,००० हजार रूपये द्यावे लागतील असे म्हणून त्यांचे वरिष्ठांचे करीता लाचेची मागणी केली. तक्रारदार यांने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे येथे तकार दिलेली होती.
तक्रारदारच्या दिलेल्या अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता इचलकरंजी नगर भूमापन कार्यालयातील तक्रारदार यांचे काम पाहणारे कर्मचारी याने तक्रारदार यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी कोळी यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे दुष्यंत कोळी यांना भेटले असता नगर भुमापन अधिकारी कोळी यांनी तक्रारदार यांचे प्लॉटचे सामीलीकरणाचे काम जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयातून करून घेण्याकरीता वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील असे सांगून तक्रारदार यांचेकडे पंच्याहत्तर हजार रूपये लाचेची मागणी केलेचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून त्याचेविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरू आहे. या बाबतची कारवाई कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षीका वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक बापू सांळूके, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप काशिद, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस नाईक सुधिर पाटील, पुनम पाटील चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांनी केली.