DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
चाकण:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्यामुळे चाकण शहरांमधील काही भागांमध्ये बांगलादेशी नागरिक हे बेकायदेशीररीत्या प्रवेश करून वास्तव्य करीत असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर गोपनीय माहितीच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व कर्मचारी ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व दहशतवाद पथक (एटीसी ) शाखा यांना गैररित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या बाबतची माहिती काढण्याचे आदेशित केलेले होते. दरम्यान दिनांक 23 /12 /2024 रोजी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत डि.बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना चाकण पोलीस ठाणे कडील दहशतविरोधी पथक (ATC) शाखेचे पोलीस हवालदार सुनील शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदाररांन मार्फत बातमी मिळाली की चाकण पोलीस ठाणे आदितीतील आळंदी फाटा येथील साईराज लॉजिंग मध्ये बांग्लादेशी नागरीक पुरुष व महिला असे सफाई कामगार म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे ,पोलीस हवालदार 706 शिंदे पोशि,/ 1613 खेडकर, पोलीस शिपाई 22 43 उद्धव गर्जे तसेच मपोशी/ 2323 उमा होले, असे दोन पंचान समक्ष खात्री केली असता सदर ठिकाणी बातमी प्रमाणे पुरुष व महिला मिळून आली त्यांच्याकडे विचारपूस केलली असता त्यांचे नावे नाव टिंकू चौधरी वय 31 वर्षे व्यवसाय मजुरी आधार कार्ड नंबर 54 81 31 53 66 46 व महिलेने तिचे नाव खादीजा खातुन वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 5WD8771297 दोन्ही राहणार साईराज लॉजिंग आळंदी फाटा मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले अधिक चौकशी करता पोलीस ठाण्यात आणले असता त्यांच्याकडे असलेले ओळखपत्राची तपासणी तपास पथकातील अधिकारी अमलदारांनी पडताळणी केली असता सदरची ओळखपत्रे बनावट असल्याचे प्रथमदर्शनी खात्री झाल्याचे विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे मूळ वास्तव्याचे ठिकाण बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगून बांगलादेशातील नाव वरील आयडी प्रमाणे असल्याचे सांगून त्यातील पत्ता गाव छालचुरा पोस्ट रानटीया जिनेगती, जिल्हा शेरपुर, राज्य ढाक्का, देश बांगलादेश असे असल्याचे सांगितले, तात्काळ सदरच्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवून संबंधित दोन्ही बांगलादेशी नागरिकांवर बेकायदेशीर भारतीय प्रजासत्ताक गणराज्यात वास्तव्य करत असल्याने त्यांच्यावर चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर, 636/ 2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 ( 4 ),336 (2),336 (3), 340(2), 3(5)सहपरकीय भारतीय कायदा 1646 चे कलम 14 (ए) (बी) 14(सी )पारपत्र अधिनियम 1697 चे कलम 12 (1)(सी) व पारपत्र (भारतात प्रवेश )नियम 1650 चे कलम 3 (अ ) या कलमान्वये चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 334 / 2024 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त मुख्यालय श्री विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडल – 3 श्री शिवाजी पवार, सहाय्य पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीनाथ घार्गे, तपास पथकाचे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, पोहवा सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमान कांबळे, यादव सहाय्यक फौजदार राजू जाधव, रेवणनाथ खेडकर, सुनील भागवत, पोलीस शिपाई शरद खैरनार, किरण घोडके, उद्धव गर्जे, महाराष्ट्र पोलीस शिपाई उषा होले, सरला ताजणे यांनी केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करीत आहे.