DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर
तुमसर :- मध्यप्रदेशातील रेती माफीयाची रेतीची खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. तुमसर ते वारा शिवनी(महाराष्ट्र – मध्य प्रदेश) आंतरराज्य महामार्गावर रेतीच्या वाहतूक ट्रक व टिप्पर मोठ्या संख्येने रेतीची तस्करी करून नागपूरच्या दिशेने जातात ही रेती रॉयल्टी ची कमी आणि चोरीची जास्त असते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रेती तस्करावर प्रहार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येथील तुमसर शहर चे महसूल विभाग आणि तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी फार हरकत मध्ये आले आहे. ही रेती माफियाची बेधडक तस्करीला लगाम कशी लावतात? ह्यांच्यावर कशी कारवाई करतात? या गोष्टीकडे सर्वनागरिकांचे लक्ष लागले आहे. ही तस्करी बरेच दिवसापासून चालत आहे पण कारवाईवर शंका निर्माण करण्यात येत आहे. आता तरी महसूल मंत्रींनी हस्तक्षेप केल्यावर पुढे काय होते. यावर सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.