DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- डॉक्टर सुखदेव काटकर
तुमसर :- वैनगंगा नदीपात्रातून रेतीची चोरी करताना तिघांना रंगेहात पकडले तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील वैनगंगा नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची चोरी करताना मिळून आल्याने तिघांवरपोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 27 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेदरम्यान करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्या मध्ये देवानंद घासीला नगरधने वय – 24, रोहीत झामसिंग परतेती वय -19 अभिजीत देवेंद्र विठोले तामसवाडी यांचा समावेश आहे. प्रकरणी वाळुसह ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.