नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांची दमदार कारवाई…


DPT NEWS NETWORK 🗞️✍️✍️
प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे

   सातारा :- अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना जेरबंद करून त्यांच्याकडून, 2 देशी बनावटीची पिस्टल, 2 मॅगझीन, 2 जिवंत काडतूसे, एक मोटार सायकल, व मोबाईल हँडसेट, असा 1,95,500 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
      मा. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक, सातारा यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानची गोपनीय माहिती काढून त्याच्यावर कारवाई करणेबाबतच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या होत्या.
  दि. 19/12/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली आहे कि, वाठार ता. कराड गावचे हद्दीतील कोल्हापूर ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चे सर्व्हिस रोडवर नवनाथ महाराज यांचे मठाच्या समोर रोडवर दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूसे विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्री. रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना मिळालेल्या बातमीचा आशय सांगून सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक रोहित फ़ार्णे यांचे पथकाने कराड तालुका पोलिसांचेसहित वाठार, ता. कराड गावचे हद्दीतील नवनाथ महाराज यांच्या मठासमोर सापळा लावला असता सदर ठिकाणी मिळालेल्या बातमीतील दोन इसम हे त्यांचेकडील मोटार सायकल वरून येत असताना दिसले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकलवरील दोन्ही इसमांना शिताफिने पकडून त्यांची व मोटार सायकलची झडती घेतली असता त्यांच्या कबज्जात 1,95,500/- रुपये किंमतीचा दोन देशी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतूसे, दोन मोबाईल हँडसेट व एक मोटार सायकल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध कराड तालुका पोलीस ठाणे येथे गुरंनं 799/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3(1),25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
   सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर 2022 पासून ते आज पावेतो 106 देशी बनावटीची पिस्टल, 4 बारा बोअर, 233 जिवंत काडतूसे व 383 रिकाम्या पुंगळ्या, 4 मॅगझीन जप्त करण्यात आलेल्या आहेत.
     मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, व मा. डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक, सातारा व त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे, श्री. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फ़ार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, साक्षात्कार पाटील, पोलीस अंमलदार सफौं. शिवाजी गुरव, अतिश घाडगे, संतोष संपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, सावीर मुल्ला, प्रवीण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित संपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील सज्जन जगताप, उत्तम कोळी, मोहित गुरव यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:36 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!