नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बिलोली येथील हायगले सरांचे विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या 2024 च्या पुरस्काराने गौरविण्यात आले


DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय

नांदेड :- महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची दरवर्षी प्रमाणे  विभागीय वार्षिक बैठक लातूर येथे डिसेंबर २०२४ रोजी हर्शोल्हासात संपन्न झाली. सदरील बैठकीमध्‍ये संगणक प्रशिक्षण केंद्रांना  विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय उत्‍कृष्‍ठ कार्याबद्दल गौरविण्‍यात येते. बिलोली तालुक्यात विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट संगणक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ च्या अधिपत्याखाली प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे. सांस्कृतिक परंपरेशी नाळ जोडणाऱ्या उपक्रमांबरोबरच आधुनिक काळातील ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांचा स्विकार करत आधुनिक तंत्रज्ञानही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यासाठी संस्था नेहमीच कार्यरत असते.
माहिती तंत्रज्ञानाने जग गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. बदलांचा हाच वेग पत्करत सुसज्ज इमारतीत सुसज्ज संगणक प्रयोग शाळेत संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांसाठी विविध कालानुरूप आवश्यक अभ्यासक्रमांची योजना राबवीत आहे. संगणक प्रशिक्षणाचे वयोगटानुसार स्वत:चे अभ्यासक्रम तयार करणे. संगणक विषयाचे कालानुरूप आवश्यक असणारे प्रशिक्षण देणे. संगणकात विशेष रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत प्रशिक्षण देणे. विद्यार्थ्यांना नित्य अभ्यासात संगणकाचा वापर करण्यास शिकविणे. संगणक प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांची कल्पकता, कल्पनाशक्ती, समस्यापरिहार, तार्किकी कौशल्य वाढ करणे. संगणकात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिरुची संपन्न करणे.
भविष्यात संगणक क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनामुळे संगणकीय क्षेत्रात बिलोली तालुक्याचा प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावत आहे. म्हणूनच बिलोली तालुक्यातील प्रत्येक पालक वर्ग आपल्या पाल्यांना संगणक प्रशिक्षणासाठी  विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट निवड प्राधान्याने करतात. विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आजतागायत प्रशिक्षणार्थीची जपलेली विश्वासार्हता,व्यवस्थापन, संगणक प्रणित विविध माध्यमातून आपल्या  तंत्रज्ञान कार्यप्रणालीची सातत्याने अपडेट राहत सुयोग्य  पद्धतीने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्याचा मानस साध्य करत आहेत या संपूर्ण समर्पित कार्याची पावती विविध पुरस्काराची सातत्यपूर्ण मालिका कायम ठेवत  महाराष्ट्र ज्ञान महामंडळचा बहुमूल्य सन -2024 या वर्षीचा बहुमान नांदेड जिल्‍हयातील बिलोली येथील विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मिळाला आहे. या वर्षीचा सदरील पुरस्कार हा समाज माध्‍यमांमध्‍ये सर्व स्‍तरावरील सशुल्‍क जाहितीद्वारे विपणन केल्‍याबद्दल मिळाला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वीणा कामत, मुख्य व्यवस्थापक अतुल पतोडी, अमित रानडे, नटराज कनकधोंड, विभागीय व्यवस्थापक कोशल ओहोळ, विभागीय समन्वयक महेश पत्रिके, जीवन लेंभे, जिल्हा समन्वयक पंढरीनाथ आघाव उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते प्रमाणपत्र व सन्‍मानचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात आले आहे. विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे शहर आणि तालुक्यातील सर्वात अग्रगण्य संगणक प्रशिक्षण संस्‍था असुन सदरील प्रशिक्षित झालेले विद्यार्थी शासकीय, खासगी नोकरीमध्ये कार्यरत आहेत सदरील संगणकीय अभ्‍यासक्रम प्रशिक्षीत विद्यार्थ्‍यांनां उत्तम संधी उपलब्‍ध करत असल्याची माहिती विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट संचालक विरनंद हायगले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:09 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!