DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रिजवान खाटीक
शहादा :- दिनांक 16 जानेवारी 25 रोजी संध्याकाळी जुनी पिंप्राणी येथील याहा मोगी मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेट्ठी यांनी उपस्थित गटातील शेतकरी महिला पुरूषांसोबत संवाद साधला. गट शेती करताना चे अनुभव समजून घेतले. गटातील काम करताना अजून कोणत्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे हे उदाहरणासह समजून सांगितले. तसेच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिला गटांची तयार केलेली सीड बँक बघून हि बँक वाढविण्याची गरज आहे. पण या ही पेक्षा या वाणांची लागवड आपल्या शेतात करून उत्पादित मालाची प्रक्रिया करून विक्री केली तर आणखी नफा कसा मिळू शकतो हे समजावून दिले. तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांविषयी माहिती सांगितली. बायफ संस्थेचे देवेंद्र पाटील यांनी फळबाग आणि बीज बँक विषयी मार्गदर्शन केले . CYDA संस्थेच्या सौ.जयश्री सपकाळे यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा केली. DSC संस्थेचे संदीप कोळी यांनी देखील आपल्या संस्थेतर्फे गावात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबत माहिती सांगितली. पाणी फाउंडेशन चे गुणवंत पाटील यांनी फार्मर् कप स्पर्धा 2024 मधील सहभागी गावे, गट आणि गटांनी केलेली कामे या बाबत माहिती सांगितली. कमी खर्चात जास्त नफा या वर्षी आम्हाला गटात एकत्र येऊन काम केल्याने मिळाला, तसेच शेतात कामे करताना आनंद मिळाला असे सौ. मोगी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संगितले. तसेच रवींद्र चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व कुवरसिंग चौधरी यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले. महिलांचे व शेतकऱ्यांचे कौतुक करणाऱ्या मा. जील्हाधिकारी मॅडम यांच्या भेटीने गावकऱ्यांना नवी ऊर्जा मिळाली.
सदर कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ महसूल अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच,समस्त गावकरी, पाणी फाउंडेशन, BAIF, CYDA, DSC, CFP या संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.