भाग दोन
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
बिलोली शहरातील सार्वजनिक हिंदू स्मशानभूमी येथे लाईटची सोय पाण्याची टाकी व एक हौद करणे गरजेचे आहे.
नांदेड:- बिलोली येथील कुंडलवाडी रोड लगत असलेल्या हिंदू स्मशानभूमीला लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमी येथे लाईटची सोय नसल्याने रात्रीची अंत्यविधी हे अंधारात कराव्या लागत आहेत तिथे लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही किंवा अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्याची सुद्धा सोय नाही हे सर्व येणाऱ्या 26 जानेवारी पर्यंत सोयी करून द्याव्यात जर 26 जानेवारी पर्यंत नाही झाल्यास लोकशाही मार्गाने सर्व हिंदू समाज 26 जानेवारी रोजी चंदा करून नगरपरिषद येथे जमा झालेले चंदा रक्कम नगरपालिकेला देणार आहेत या अगोदर आपण बिलोली शहरातील अत्यंत आवश्यक असलेल्या स्मशानभूमी येथील सर्व सोयी लवकर करून द्यावा संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर कामे करून द्यावेत असे निवेदन देवांना नरसिम्हा तोंदरोड, लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार, हवेलीकर माधव पिराजी, राजेश हनमल्लू टोटलवार, संदीप राजाराम पोपुलवार, दत्ता नागनाथ सांडगे, माधव शिवाजी हरणे, विनोद गुडमलवार, माधव गादगे, दत्ता बोडके, शिवाजी करोड, शंकर देशपेटवाढ, श्रीराज संगमवार, शिवचंद्र येंबडवार, पवन सोळंके, बसवराज जामनोर, मनोज पाटील, सुनील पाटील, सुरेश आसमोड, विनोद कुडके, अजय मरकले, मालू चिडमलवाड, रोहित मामडे, हरणे गंगाधर, हरणे संतोष, गजानन पांचाळ, अॅड महेश कुलकर्णी, अरुण दावलवार, हनमलू एम्बडवार, बालाजी कऊटकर, माधव जामनेर, कृष्णा बिलोलीकर, राजेश बारुळे, राजकुमार गादगे, दत्ता खंडेराय, सावकार तुप्तेवार, बालाजी रावणगावकर, साईनाथ पांचाळ, दत्ता बिलोलीकर, राजेश बोईनवाड या सर्वांनी सह्या करून येणारा 26 तारखेचे नियोजन पण सांगितले या निवेदनाचे लवकरात लवकर नगरपालिकेने दखल घेईल अशी पण चर्चा चालू होती.