DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- संदीप सकट चंदगड
कोल्हापूर:- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी डॉ .अजित वसंतराव पाटोळे, वय ४९ वर्षे डॉक्टर, स्वराज्य हॉस्पिटल गडहिंग्लन, रा. २३४४ साधना हायस्कुलजवळ, संभाजीनगर गडहिंग्लज, ता. गडहिंग्लन, जिल्हा कोल्हापुर, इंद्रजित शिवाजीराव पाटोळे, वय ४८, प्रशासन स्वराज्य हॉस्पिटल, गडहिंग्लज, रा. मिसाळ चाळ, आझाद रोड, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लन, जिल्हा कोल्हापुर यांनी लाचेची मागणी करून स्विकारली. तक्रारदार यांचा मित्र चक्कर येवून पडल्याने त्यांचे डावा खुबा फॅक्चर झाला असल्याने खुब्याचे ऑपरेशन महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतुन होत असल्याने त्याबाबत स्वराज्य हॉस्पिटल गडहिंग्लज येथे चौकशी करून ऑपरेशन करीता अॅडमीट केले व त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे सादर केली स्वराज्य हॉस्पिटलचे डॉक्टर अजित पाटोळे व तेथील प्रशासक इंद्रजीत पाटोळे यांनी तक्रारदार यांचे खुब्याचे ऑपरेशन महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतुन करून देवून शासकिय योजनेचा लाभ मिळणेसाठी २०,००० हजार रुपये मागणी करून त्यातील १०,००० हजार रुपये ऑपरेशन पुर्वी स्विकारून उर्वरीत १०,००० हजार रुपयेची मागणी केली . याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दिली .
तक्रारदार यांच्या तक्रार अर्जाप्रमाणे दिनांक १८.०१.२०२४ रोजी पडताळणी केली. त्यामध्ये इंद्रजीत पाटोळे यांनी तक्रारदार यांचे मित्राचे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतुन डावे खुब्याचे ऑपरेशन करून शासनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी यापुर्वी १०,००० हजार रुपये स्विकारल्याचे व त्यानंतर ऑपरेशन झाले असल्याचे सांगुन उर्वरीत १०,००० हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच दिनांक २०.१२.२०२४ रोजीच्या पडताळणीमध्ये डॉक्टर अजित पाटोळे यांनी तक्रारदार यांचे मित्राचे ऑपरेशन महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतुन मोफत झाल्याचे मान्य करून तक्रारदार यांचेकडुन १०,०००हजार रूपये यापुर्वी स्विकारल्याचे मान्य करून उर्वरीत १०,००० हजार रुपये मागणी करून तडजोडी अंती ८,००० हजार रुपये ची मागणी करून इंद्रजित पाटोळे यांचेकडे देण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लागलीच सापळा कारवाई आयोजीत केली. स्वराज्य हॉस्पिटल गडहिंग्लज येथे पंच साक्षीदार यांच्या समक्ष तक्रारदार यांचेकडुन इंद्रजित पाटोळे यांनी ८००० हजार रूपये लाच रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले .
अजित वसंतराव पाटोळे, व इंद्रजित पाटोळे यांचेविरूध्द गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रीया सुरू केली. सदरची कारवाई
कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षीका वैष्णवी पाटील, यांच्या मार्गदर्शनानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बापू साळुंके, पोलीस निरीक्षक व पथक यांनी केली आहे.