DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मुर्तिजापूर:- अनभोरा येथिल पाटलाचा ढाब्या जवळ दि. १० फेब्रुवारीला सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास ओवर टेक मुळे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन पोबारा केला.
यावेळी दुचाकीवरील दोन व्यक्ती जागीच ठार झाले.
हे दोन्ही व्यक्ती भगोरा गावातील असून दुचाकी स्वार मृतक मनोज गोवर्धन वानखडे वय ४५ तर दुसरा मृतक व्यक्ती अनिकेत चंद्रमणी खंडारे वय २० हे दोघे व्यक्ती कामा निमित्त दाळंबीला जात असताना ओवर टेक मुळे दुचाकी क्रमांक एम एच ३० ऐ के १९५ ला समोरून अज्ञात वाहनाने धडक देऊन पोबारा केला. यावेळी दुचाकीवरील दोन व्यक्ती जागीच ठार झाले, यांना त्वरीत शासकीय रुग्णालय मुर्तिजापूर येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले,
यावेळी घटना स्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू आहे.
मृतक मनोज गोवर्धन वानखडे यांच्या मागे त्यांची पत्नी अनिता दोन मुली व एक मुलगा त्या बरोबरच मोठा आप्त परिवार आहे.
मृतक अनिकेत चंद्रमणी खंडारे याला आई वडील व एक भाऊ दोन बहिणी व आजी आजोबा बरोबर चुलते अशा मोठा आप्त परिवार आहे. मृतकांना बघण्यासाठी भगोरा गावात आप्तेष्टांनी एकच गर्दी केली होती.
त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे .
नशेचे प्रमाण वाढल्यामुळे हायवेवर अपघाताची संख्या वाढली असून शासनाने यावर काही उपाय योजना करावी अशी गावातील नागरिकांची मागणी आहे.