DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम माना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम करूम येथे दि.२४ चा रात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण करून जबरी चोरी केली असून यामध्ये एका युवकाला चोरट्यांनी लाकडाच्या दांडक्याने मारहाण केली. त्याचे हाताचे हाड फ्रँक्चर झाल्याचे सांगण्यात आले. येथे जबरी घरफोडी याबाबत प्राप्त माहितीनुसार माना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्राम कुरूम येथे दि. २३च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कुरुम येथील रहिवासी तालिबबेग सत्तारबेग याच्या घरात घुसून ६५ हजार रुपये तसेच तीन ग्राम सोन्याची अंगठी असा ऐवज लंपास केला. यावेळी त्यांचा मुलगा तौसीफबेग तालीबबेग याला चोरट्यांनी हातावर मारून जखमी
केले असून त्याच्या हाताचे हाड फ्रैक्चर झाल्याचे सांगण्यात आले. तर त्यांच्या शेजारीच राहणारे शेख जावेद शेख जाबीर यांच्या घरात प्लॉट विक्रीतून आलेले ९० हजार रुपये तसेच महिलेच्या गळ्यातील आभूषण व सोन्याची अंगठी असा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घराच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या.
कुरुम परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कुरुम येथील गुलशन नगर येथे चोरट्यांनी दोन घरांना बाहेरून कुलूप लावून सुमारे दीड लाखाची रोकड व सोन्याची आभूषण लंपास केले आहे. शेख जावेद शेख जाबीर वय ४० वर्ष रा. कुरुम हे आपल्या कुटुंबीयांसह २३ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या घरात झोपले असताना बाहेरून दाराची कड़ी चोरट्यांनी पाठीमागून घरात प्रवेश करून चोरी केली. अर्ध्या रात्री त्यांच्या पत्नी
लघुशंकेसाठी उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. शेख जावेद शेख जाबीर यांनी घरात पहाणी केल्यावर त्यांना घरात ठेवलेली प्लॉट विक्रीतून आलेली ९० हजार रुपयाची रोकड पेटीतून चोरीस गेल्याचे त्यांना दिसून आले. तसेच त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या तालीमबेग सत्तारबेग यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून तुरीची विक्री करून आणलेले तुर विक्रीचे ६० हजार रुपये अज्ञात चोरट्यानी कपाटातून लपास केले. याप्रकरणी माना पोलीस स्टे शनला गुन्हदाखल
करण्यात आला आहे. सदर चोरी झाल्यानंतर घटनास्थळी तसे तज्ञ व स्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दाभाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाच्या सूचना दिला. पुढ़ील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरवशे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.