DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मुर्तिजापूर येथिल तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून तमाम शेतकरी अन्न त्याग आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्रात आजही दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकरी आत्महत्या बाबत महाराष्ट्र देशात अवल आहे, देशात झालेल्या साडेचार लाख आत्महत्यापैकी मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे, शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली गेली पाहिजे, म्हणजे सरकारने इतर फालतू कामे थांबून शेतकरी आत्महत्या कशा थांबतील याचा विचार केला गेला पाहिजे, सरकारी आणि बिगर सरकारी यंत्रणा हा प्रश्न सोडविण्याच्या कामी लागल्या पाहिजेत, जसे कोविडच्या वेळेस केले होते तसे, ज्या सरकारांनी अजूनही शेतकऱ्यांचे माफी मागितले नाही किंवा माफी तर लांबची गोष्ट आहे साधी श्रद्धांजली देखील अर्पण केली नाही, त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या भल्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे शेतकरी आत्महत्या च्या बाबतीत सरकार क्रूर आहे. अशी शेतकऱ्यांचा आक्षेप आहे,
19 मार्च 1986 रोजी यवतमाळ चिलगव्हाणचे साहेबराव करपे पाटील त्यांची पत्नी मालती ताई व त्यांच्या चार लेकरांनी पवनणार जवळच्या दत्तपूर आश्रमात सहकुटुंब आत्महत्या केली होती, या १९ मार्चला त्यांच्या 39 वा स्मृतिदिवस आहे 2017 पासून लाखो संवेदनशील लोक हा उपवास करतात. यावर्षीही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाले आहेत, म्हणून या वर्षी हा उपवास आपल्याला करावा लागणार अशी शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
त्यानंतर हा उपास धार्मिक नाही, उपोषण म्हणजे राजकारण नाही, असे अन्यत्याग संवेदनशील माणसांनी व्यक्त केला आहे आणि हा शेतकरी स्वातंत्र्याचा मुलगा आहे असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
यावेळी अन्न त्याग उपोषणासाठी आंदोलननात सहभागी झालेले शेतकरी कार्यकर्ते राजूभाऊ वानखडे, अरुण बोंडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, श्रीकृष्ण गुल्हाने, प्राध्यापक प्रमोद राजंदेकर, संजय उमाळे, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बाभाणीया, कैलास साबळे, पंकज वानखडे, प्रफुल्ल मालधुरे, प्रकाश राजपूत, किशोर भाऊ गाडगे, संतोष रुद्रकार, ज्ञानदेव भड, निखिल गावंडे, अरविंद तायडे, प्रीतम देशमुख, किरण नाटक, निरंजन डोरले, संजय घुमशे, सुरेश फुलमाळी, जीवन ढोकणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबाबत मत व्यक्त केले.