DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाइम
प्रतिनिधी:- रिजवान खाटीक
शहादा:- बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील शहादा शिरपूर रोडवर वडाळी ते कोठली रस्त्यालगत असलेल्या हॉटेल गोविंदच्या समोर सकाळी सात वाजेच्या सुमारास मोटरसायकलने कोठलीकडे जात असलेल्या महाविद्यालयीन युवकाचा अज्ञात वाहन चालकाने समोरून मोटरसायकलला धडक दिल्याने युवकाला डोक्यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने वडाळीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शहादा तालुक्यातील वडाळी येथे दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्याऱ्या काठेवाड गुजरात राज्यातील भरवाड समाजाचे कुटुंबीय गेल्या ३० ते ३५ वर्षापासून संपूर्ण परिवार वास्तव्याला आहेत. रमेश भरवाड (वय २२ ) हा युवक दिनांक १० मार्च सकाळी सात वाजेच्या दरम्यान वडाळी येथून बस स्थानकावर दूध व्यवसायाची खरेदी विक्री आटोपून कोठली कडे दुधाचे पैसे देण्यासाठी आपली डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच ३९ ए ई ६२४० ने जात कोठली शिवारातील हॉटेल गोविंद च्या शेजारी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल सह फेकला गेल्याने त्याच्या डोक्यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.अपघाताचे वृत्त कळताच वडाळी येथील उद्योजक दीपक गोरख पाटील जयेश माळी प्रदीप गोसावी ललित गोसावी निलेश गोसावी सह युवक तात्काळ अपघात स्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत अज्ञान वाहन चालकाने गाडीसह पसार होण्यास यशस्वी झाला होताच जखमी गंभीर स्वरूपातील जखमी अवस्थेतील रमेशला तात्काळ शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तपासणी केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याचे शवविच्छेदन सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले मयत रमेश भरवाड हा परीक्षा देण्यासाठी बडोदा( गुजरात) येथे गेला होता व गेल्या दोन दिवसपूर्वीच वडाळी येथे परत आला होता दूध व्यवसाय करण्यास परिवाराला मदत करत असे कुटुंबियासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सारंगखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची खबर रतिलाल नागजी भरवाड नोंद करण्यात आली असून पुढील तपास सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण बहारे करीत आहे.