ए एस ट्रेडर्स व त्याचे इतर संस्थेचे संचालक यांची मालमत्ता जप्त होणेकामी मा. महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांचे आदेश निर्गमित, जप्त मालमत्ता यावर नियत्रंण ठेवणेकरीता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर, उपविभाग, कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती.
DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- ए एस ट्रेडर्स व त्याचे इतर उप कंपनीचे संचालक यांनी यातील गुंतवणूकदार यांना वेगवेगळी प्रलोभन व आमिष दाखवून त्यांचेकडून मोठया प्रमाणात गुंतवणूकीसाठी पैसे स्विकारुन दिले आश्वासनाप्रमाणे पुर्तता न करता कंपनीचे कार्यालय बंद करुन केले फसवणुक बाबत यातील फिर्यादी यांनीं दिले फिर्यादी वरुन शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ९१७/२०२२भा.द.वि.सं. कलम ४०६,४०९,४२०, १२० (ब), २०१ सह महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ कलम ३,४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणेत आलेला असून सध्या सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थागुशा, कोल्हापूर हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील ए एस ट्रेडर्स व त्याचे इतर उप कंपनीचे संचालक यांनी गुन्हयातील अपहारीत रक्कमेतून गुन्हयाचे कालावधीत खरेदी केलेल्या स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता बाबत गुन्हयाचे तपासात शोध घेवून सदर मालमत्ताची नोंदणीकृत कागदपत्रे संबंधीत शासकीय दुय्यम निबंधक कार्यालय व तलाठी कार्यालय यांचेकडून प्राप्त करुन घेतले होते. तसेच गुन्हयाचे तपासामध्ये यातील आरोपीत यांचे नावे असलेली बँक खातेचा शोध घेवून संबधीत बँक खाती गुन्हयाचे तपासाकामात गोठविण्यात आलेली आहेत.
सदर गुन्हयात जप्त केलेल्या स्थावर व जंगम मालमत्ता तसेच गोठविण्यात आलेली बँक खाती हे महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ कायदयाअंतर्गत जप्त होवून अधिसूचना होणेकामी शासन परिपत्रक अन्वये सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो मा. अपर पोलीस महासंचालक साो, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. जिल्हाधिकारी साो, कोल्हापूर कार्यालयास सादर केलेला होता. सदर कार्यालयाकडून सादर केलेल्या प्रस्वावाची पडताळणी होवून त्यामध्ये नमूद केलेल्या ए एस ट्रेडर्स व त्याचे इतर उप कंपनीचे संचालक यांचे नावे असलेल्या मालमत्ता जप्त होवून अधिसुचना होणेकामी मा. महाराष्ट्र शासनास सादर करणेत आलेला होता. मा. महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (विशेष) यांचेकडून दिनांक ०७/०३/२०२५ रोजी याबाबत आदेश निर्गमित करणेत आलेले असून जप्त केलेल्या मालमत्ता यावर नियत्रंण ठेवणेकरीता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर, उपविभाग, कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करणेत आलेली आहे.
तसेच या व्यतरिक्त सदर गुन्हयात ए एस ट्रेडर्स व त्याचे इतर उप कंपनीचे संचालक यांच्या आणखीन मिळून आलेल्या मालमत्ता बाबत नव्याने प्रस्ताव क्र. ०२ हा तयार करुन तो मा. अपर पोलीस महासंचालक साो, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना सादर करणेत आलेला आलेला आहे. तसेच सध्या गुन्हयाचे तपासात यातील आरोपीत यांचे मालमत्ता बाबत शोध घेतला असता मिळून आलेल्या मालमत्ता बाबत नव्याने प्रस्ताव तयार करणेचे कामकाज सुरु असून यातील आरोपीत याच्या जास्तीत जास्त मालमत्ताचा शोध घेवून मिळून येणा-या सर्व मालमत्ता जप्त करणेची कार्यवाही करणेत येणार आहे.
सदर गुन्हयाचा तपास हा मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शननुसार व मा. पोलीस उप अधिक्षक सुवर्णा पत्की, आगुशा, कोल्हापूर यांचे पर्यवेक्षणाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर स्थागुशा, कोल्हापूर व तपास टीम करीत आहेत.