DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला
मेहुणबारे – उंबरखेड येथील वस्तीगृह अधीक्षक विनोद पंडीत पाटील यांचे अपघाती निधन झाले. मयत विनोद पंडीत पाटील वय 45 वर्ष रा. उंबरखेड ता.चाळीसगांब ह.मु. शिक्षक कॉलणी धुळे रोड चाळीसगांव हे दि. 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मोटार सायकल क्रं. एम.एच. 19 ए.डब्लु 0035 होन्डा ट्युस्टरने उंबरखेड येथे ड्युटीवर चाळीसगांव कडुन मालेगांव कडेस जात असता मालेगांब कडुन चाळीसगांव कडेस येणारी टाटा अल्ट्रोज चार चाकी वाहन क्रं. एम. एच. 42 बी.एन. 0248 यावरील चालक नाव गाव माहित नाही. याने त्याचे ताब्यातील वाहन रत्याचे परिस्थीतीकडे दुरलक्ष करीत भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवुन विरुध्द बाजुने त्यांचे मोटार सायकलीस समोरुन जोराने ठोस मारल्याने झालेल्या अपघातात विनोद पंडीत पाटील यांचे डोक्यास, तसेच पोटाचे खाली गंभिर दुखापत होवुन नाकातुन कानातुन रक्त येवून जखमी होवुन मयत झाले असुन त्यांचे मरणास व मोटार सायकल नुकसानीस कार चालक हा कारणीभत झाला असुन नमुद कार जागेवरच सोडुन पळुन गेला आहे. यासंदर्भात उंभरखेड येथील शिक्षक जितेंद्र रवींद्र पाटील यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार किशोर पाटील करीत आहेत.