DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- निवास गागडे
इचलकरंजी:- पहलगाम भ्याड हल्ला प्रकरणी बहुजन सामाजिक संघाच्या वतीने इचलकरंजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पहलगाम काश्मीर हे एक सुंदर पर्यटक असल्यामुळे तिथे देश विदेशातील नागरिक फिरण्यासाठी जात येत असतात. तर नुकताच पहलगाम काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यांमध्ये अतिरेकी दहशतवाद्यांनी आलेल्या पर्यटकावर गोळीबार करून निष्पाप 28 लोकांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 8 नागरिक व मुस्लिम समाजाचे 15 नागरिक आणि इतर ठिकाणाहून आलेले पर्यटक अशा 28 जणांची हत्या करण्यात आली. त्यावेळेस फिरण्यास आलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोणतीही सिक्युरिटी तैनात नव्हती. अशा कठीण परिस्थितीत पहेलगाम काश्मीर येथील मुस्लिम बांधवांनी (ड्रायव्हर, घोडेस्वार, हॉटेल मॅनेजमेंट, गार्ड व इतर) स्वतःचा जीव धोक्यात घालून व्यवस्थित रित्या पर्यटकांच्या घरी पोचविण्यापर्यंत खाण्यापिण्याची व राहण्याची सोय करून सुखरूपाने पोहोचविण्याचा भाईचारा ( बंधुत्व प्रेम ) निभवलेला आहे. ही सत्य परिस्थिती तेथून जीवित आलेले आपल्या पर्यटकांनी मीडिया द्वारा प्रसारित केलेली आहे. लोक विनाकारण हिंदू मुस्लिम जातीवादी तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडिया द्वारे प्रसारित होत आहे. तरी भारतातील कायदा व सुव्यवस्था शांतता राहावी म्हणून ज्या दहशतवादी अतिरेक्यांनी निष्पाप लोकांची क्रूरपणे हत्या केली आहे. त्यांच्यावर सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन त्यांच्यावर हल्ला करून आतंकवादी निर्माण करणारे कारखाने उध्वस्त करून दहशतवादी अतिरेक्यांना भुई सपाट केले पाहिजे.
या घटनेचा आम्ही बहुजन सामाजिक संघ इचलकरंजी च्या वतीने जाहीर निषेध करून भ्याड हल्ल्यात विनाकारण 28 निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात झाली. त्या लोकांच्या परिवाराला सरकारने मोठी मदत देण्यात यावी. असे निवेदनाद्वारे इचलकरंजी प्रांताधिकारी यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मांडून पहलगाम काश्मीर येथे अतिरेकी दहशतवादीकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे जाहीर निषेध करण्यात आले. त्यावेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे, शोभा वसवाडे, इस्माईल ऐनापुरे, असिफ संजापुरे, हबीब मुल्ला, बबलू गागडे, सलीम मुल्ला व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.