DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- तानाजी भोकरे
आजरा:- आजरा शहरातील पंचायत समिती जवळ अपघात होवून पुणे येथील तीघे जखमी झाले आहेत.
उभ्या चारचाकीसह दुचाकींचेही या अपघातात नुकसान झाले आहे. प्रसाद चंद्रकांत पार्सेकर, गंधा प्रसाद पार्सेकर व शनया प्रसाद पार्सेकर (रा प्लॉट नं 13/204 क्रिस्टल कैंसल धायरी फाटा पुणे ) अशी जखमींची नांवे आहेत.निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी रक्षित हर्षद शाहा (वय ४३ रा. मालाड मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्सेकर कुटुंब दोडामार्ग आंबोली मार्गे आजरा येथे येवून चहा पिने करीता पंचायत समिती येथील रोडवर आपली गाडी ( MH 12 VC 2690) उभी करून चहा पिण्यासाठी उतरत असताना गडहिंग्लज कडून येणाऱ्या ( MH 47 BV 2610) या इनोवा चारचाकिने समोरून जोराची धडक दिली. यामध्ये प्रसाद यांचे उजव्या पायाला व हाताला, मुलगीच्या डोक्याला किरकोळ दुखापत तर त्यांच्या पत्नीच्या दोन्ही गुडघ्यांना मुक्कामार लागला. या गाडीचे पाठीमागील चारचाकी ( MH 09 GJ 6216) या गाडीचेही नुकसान झाले आहे.