DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- तानाजी भोकरे
आजरा:- आजरा तहसील कार्यालयात शेतकरी खरीप हंगामाबाबत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकारी, कृषी अधिकारी, आजरा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली.
खरीप हंगामात शेतकरी वर्गाला लागणारी बी -बियाणे, रासायनिक खते प्रमाणित असलेबाबत खात्री करूनचं विक्रीस परवानगी देणे, प्रत्येक कृषीसेवा केंद्रांची तपासणी, करणे कृषी व महसूल खात्याचे संयुक्त भरारी पथकाने बोगस बी बियाणे व भरमसाठ, फसव्या दराने रासायनिक खते विक्री करणाऱ्या सर्व केंद्रावर कठोर कारवाई व गुन्हे नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळ्यात कर्नाटक व इतरराज्यातून फळांची झाडे विक्रीला येतात त्यातून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळणे, कृषी विक्री केंद्र दुकानातील सॅम्पल घेऊन त्याचे नमुने तपासणीला पाठवणे बाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला खत विक्री व कृषी सेवा केंद्रांचे विक्रेते, शिवसेनेचे आजरा तालुकाप्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, आत्मा कमिटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई, सुनिल दिवेकर,संतोष बाटले मंदार बिर्जे, साळगावचे सरपंच धनंजय पाटील दाभील सरपंच युवराज पाटील वइतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.