DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- निवास गागडे
इचलकरंजी :- इचलकरंजी शहरातील आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी केंद्र असणं आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या नियमावली प्रमाणे दिलेल्या ठिकाणी नाहीत असा अहवाल इचलकरंजीतील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. आपले सेवा केंद्र यांनी ठिकाण बदल बाबत सक्षम अधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता सोयीनुसार ठिकाणे बदलली होती. इचलकरंजी अप्पर तहसिलदार यांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान विभाग 19 जानेवारी 2018 मधील कलम 8 (३) नुसार गंभीर प्रकारच्या चुका आढळून आलेले केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. नोटीस मध्ये आपले सेवा केंद्राचे लॉगिन का रद्द करणेत येऊ नये? याबाबतचा लेखी खुलासा कार्यालयास समक्ष उपस्थित राहून सादर करण्यात यावा असे कळविले आहे. आपले सेवा केंद्र यांनी समाधान कारक खुलासा नाही दिलेस गृहित धरून आपले सेवा केंद्राबाबत शासन निकषाप्रमाणे उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.
असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी इचलकरंजी शहरातील आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना लेखी नोटीसा लागू केलेल्या आहेत. सात दिवसांत परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत अशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. अप्पर तहसीलदारांनी कारवाई करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. काही आपले सेवा केंद्र चालक यांनी स्थानिक लोक प्रतिनिधीं यांच्या कडे कारवाई करण्यात येऊ नये यासाठी अंतर्गत फिल्डींग लावलेली असल्याची चर्चा सुरू आहे.
इचलकरंजी शहरातील सेवा केंद्र चालक यांनी महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून चालु केले आहेत. तर काही केंद्र ग्रामीण भागात परवाने असतानाही इचलकरंजी शहरात मोक्याच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे ठाण मांडले आहेत अशा सेवा केंद्रांकडुन शासनाची दिशाभूल करणारा खुलासा सादर करतील अशी शक्यता काही सेवा केंद्र चालक यांच्यात चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तय्यब गडकर यांनी याबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा बेकायदेशीर सेवा केंद्र बंद करण्यात यावीत अशी मागणी केलेली आहे.



