समाजाने आदर्श घ्यावा – अनिलभाऊ चित्ते
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
धुळे:- कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष व धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष शिरपूर नगरीतील कुंभार समाजाचे नेते समाजभूषण श्री.रातीलाल भाऊंचा वाढदिवस हा कुंभार समाजासाठी जेवढा खास होता तेवढाच तो समतेचा आणि सामाजिक न्यायाचां संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना प्रेरित असा हा वाढदिवस होता. रतीलालभाऊंनी गरीब श्रीमंतीची दरी ओलांडून आज दिव्यांग,कर्णबधिर, मतिमंद अशा समाजातील उपेक्षित वंचित घटकांना भोजनाची मेजवानी देऊन आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करून कुंभार समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. आज याप्रसंगी त्यांची दिव्यांगा प्रती व समाजातील उपेक्षित घटकांप्रती असलेली तळमळ त्यांच्या कार्यातून प्रत्यक्ष दिसून आली. असे वाढदिवस समाजात साजरे व्हायला पाहिजेत. आपणही अशा रंजल्या गांजल्या दिव्यांग मतिमंद मुलांच्या आयुष्यात कधीतरी जायला पाहिजे त्यांना जवळून अनुभवता आले पाहिजेत. असे गौरउदगार पत्रकार अनिलभाऊ चित्ते यांनी या वाढदिवसा प्रसंगी काढले. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. जे कां रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥ मृदु सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त॥ ज्यासी आपंगिता नाहीं। त्यासी धरी जो हृदयीं॥ दया करणें जे पुत्रासी। तेचि दासा आणि दासी॥ तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ती॥
समाजात अनेक अंध,अपंग,मतिमंद,दिव्यांग दु:खी-कष्टी माणसं जागोजागी दिसतात. त्यांच्यावर आलेल्या संकटांशी दोन हात करता करता ते थकून गेलेले दिसतात. मग अशा या अत्यंत हलाखीचं जीवन जगणार्याला कुणीही सोबत घ्यायला सहजासहजी तयार होत नाही. त्यांची कुचंबना होताना दिसते. रोज-रोज होणार्या अपमानित जीवनाला ते कंटाळून जातात. त्यांचं जीवन सुसह्य करण्याकरिता कुणीही पुढं येत नाही. अशाच वेळी माणसाला चांगल्या संगतीची गरज असते. चांगला सहवास, मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा पडझडीच्या काळात जर का कोणी आपलं दु:ख समजावून घेत असेल,आत्मीयता दाखवत असेल आणि हे सर्व नि:स्वार्थपणे कुणी जर करत असेल तर असं हे पवित्र कार्य माणसातीलच असलेला तो संत असतो, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. देव दुसरा-तिसरा कोणी नसून तो माणसाच्याच रूपात असतो. संकटाच्या वेळी आपल्या मदतीला धावून येतो तोच खरा संत.अशाच वेळी त्याचं वेगळेपण जाणवत असतं आणि आज श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या अभंगाला अभिप्रेत असणारे कार्य शिरपूर येथील प्रसिध्द उद्योजक कॉन्ट्रॅक्टर, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष समाजभूषण आदरणीय श्री.रातीलालभाऊ कुंभार यांचा वाढदिवसा आज शिरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागां अंतर्गत येणाऱ्या अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहात जाऊन साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.शामकांतभाऊ ईशी, कार्याध्यक्ष सुभाष कुंभार, तालुका अध्यक्ष, गोकुळ कुंभार, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे युवा सरचिटणीस किशोरभाऊ कुंभार, धुळे जिल्हा युवा उपाध्यक्ष भूषणभाऊ कुंभार, धुळे जिल्हा विट व्यवसाय आघाडीचे प्रवीण भाऊ धाडे, वकील आघाडीचे ॲड.पंकज वाघ, संपर्क प्रमुख नारायण भाई जगदाळे, बाळकृष्ण वाघ, धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तथा पत्रकार अनिलभाऊ चित्ते व सौ. योगिता चित्ते, अध्यक्ष बहाळकर साहेब यांच्या सह रतीलाल भाऊंवर प्रेम करणारे संपुर्ण धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्यातील समस्त कुंभार समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



