(डॉक्टर मंडळींनी घेतला तीन तास आस्वाद)
DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:-मिलिंद इंगळे
अकोला:- मुर्तिजापूर येथे मराठी गझल प्रांतातील अमिट ठसा उमटविणारे समाधी या गझलसंग्रहाचे रचिते तसेच वाशिमचे गझल बादशाह नामवंत गझलकार चंद्रशेखर भुयार यांचे लोटस इंटरनॅशनल स्कूल मुर्तिजापूर येथे स्पेशल गझल मैफल घेण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पंकज पातालबंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आशिष चक्रनारायण तसेच विशेष उपस्थिती व गझल मैफलीचे मुख्य आयोजक नामवंत डॉ विक्रम शर्मा हे होते.
आणि पाहुणे म्हणून डॉ प्रशांत अवघाते,कवी प्रविण नागपुरे उपस्थित होते.
या मैफलिला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे गझलकार चंद्रशेखर भुयार यांनी विशेष आभार मानले कारण आतापर्यंत त्यांच्या आयुष्यातील मुर्तिजापूर मधली उत्स्फूर्तपणे दाद मिळवणारी पहिली मैफल ठरली, आषाढी एकादशी पर्वावर प्रेक्षकांनी भरभरून मैफलीचा एवढा आनंद लुटला की तीन तास जागेवरून रसिक उठले नाहीत .
मैफलीत पुढील गाजलेले शेर व गझल
“जिंदगीला पाज दारू बेवडी आहे जिंदगी
जेवढी त्याने दिली बस तेवढी आहे जिंदगी”
“जिंदगी तजवीज आहे जा कुठेही
हाडकांची झीज आहे जा कुठेही”
हा ही बोगस तो ही बोगस या गझलला तर प्रेक्षकांनी खुपच दाद दिली.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण सोनोने दारव्हा यांनी केले तर आभार डॉ विक्रम शर्मा यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सृजन साहित्य संघ, गझलदीप प्रतिष्ठान, कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ, व शर्मा हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच लोट्स इंग्लिश स्कूलचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.