माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे. यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा प्रभू यांनी कणकवलीमध्ये झालेल्या व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात केली. यापुढे पर्यावरणाचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकसभेत राजापूर मतदारसंघाचं सलग चारवेळा प्रतिनिधित्व केलेले, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेले सुरेश प्रभू सध्या राजकारणापासून दूर असल्याचं दिसत होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यानंतर यापुढे राजकारण विरहित प्रश्न सोडवायचे आहेत असं सांगत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाला रामराम ठोकला आहे.